News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • जालना मर्चंट मधील गैरव्यवहाराशी पूर्णवादी चा संबंध नाही :ग्राहकांनी काळजी करू नये!

    जालना मर्चंट मधील गैरव्यवहाराशी पूर्णवादी चा संबंध नाही :ग्राहकांनी काळजी करू नये!

    बीड –जालना मर्चंन्ट बँकेत झालेल्या गैरव्यवहाराशी पूर्णवादी बँकेचा काहीही संबंध नाही. या बँकेत जो गैरव्यवहार झालेला आहे त्याबाबतीत आमच्या बँकेने गुन्हे दाखल केले आहेत, तसेच उर्वरित लोकांकडून वसुलीची प्रक्रिया सुरु आहे. बँकेच्या ग्रहकांनी काळजी करू नये असे आवाहन बँकेचे अध्यक्ष डॉ सुभाष जोशी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी यांनी केले आहे. पूर्णवादी बँकेच्या सर्व…

  • देशपांडे हल्ला प्रकरण :खोटा गुन्हा मागे घ्या, शिष्टमंडळाने घेतली एसपी कावत यांची भेट!

    देशपांडे हल्ला प्रकरण :खोटा गुन्हा मागे घ्या, शिष्टमंडळाने घेतली एसपी कावत यांची भेट!

    बीड -निवडणुकीतील पराभवाचा राग मनात ठेवून p पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव यांनी पाच दिवसापूर्वी भाजप नगरसेविका सौ भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांचे वडील अरुणराव देशपांडे यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा मागे घेण्यात यावा तसेच जाधव याच्यावर कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणात खोटा गुन्हा…

  • उपसंचालकांच्या अहवालात दोषी असणारे शिंदे शिक्षणाधिकारी यांच्या अहवालात क्लीन!

    उपसंचालकांच्या अहवालात दोषी असणारे शिंदे शिक्षणाधिकारी यांच्या अहवालात क्लीन!

    बीड -बीडचे वादग्रस्त निलंबित शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात परळीच्या एकाच शाळेत झालेल्या घोटाळ्यात उपसंचालक यांनी दिलेल्या अहवालात शिंदे दोषी ठरले, त्यांच्यावर नीलम्बनाची कारवाई झाली मात्र त्यानंतर सहा महिन्यांनी बीडच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्या चौकशीत शिंदे यांना क्लीनचिट देण्यात आली. परळीच्या त्या शाळेत कसलाही अपहार झाला नाही असे देखील पाटील यांनी म्हटले. उपसंचालक यांच्या…

  • संस्थाचालकात वादावादी, भरती अन बढती चा मुद्दा ऐरनिवर!

    संस्थाचालकात वादावादी, भरती अन बढती चा मुद्दा ऐरनिवर!

    बीड -बीडच्या नगररोड भागात असलेल्या एका मोठ्या शिक्षण संस्थेत कार्यकारिणीच्या बैठकीनंतर संस्थाचालकात चांगलीच वादावादी झाली. बैठकीला अध्यक्ष आणि सचिव उपस्थित नसल्याने बैठक रद्द झाली मात्र बाहेर पडल्यावर झालेल्या वादावादी नंतर कर्मचारी भरती आणि बढती वरून हा वाद झाल्याची चर्चा आहे. चाळीस पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या बीडच्या नगर रोड भागातील एक शिक्षण संस्था सध्या संस्थाचालकांच्या वादामुळे…

  • लाचखोर अधिकाऱ्यास अटक!

    लाचखोर अधिकाऱ्यास अटक!

    बीड – येथील शासकीय निरीक्षण गृहाचा प्रभारी अधीक्षक कपिल कांबळे यास तीस हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा हजेरी अहवाल सुरळीतपणे वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी आणि संबंधित आदेश काढण्यासाठी कपिल कांबळे याने 45 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी रविवारी तक्रार प्राप्त…

  • पराभव जिव्हारी लागला, सागर देशपांडे यांच्यावर जाधव कडून हल्ला!

    पराभव जिव्हारी लागला, सागर देशपांडे यांच्यावर जाधव कडून हल्ला!

    बीड – नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्यामुळे कबाड गल्ली भागातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार आणि माजी सभापती बाळासाहेब जाधव यांच्यासह पाच ते सात जणांनी भाजप नगरसेविका सौभाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर भ्याड हल्ला केला. विशेष म्हणजे हा सगळा हल्ला होत असताना घराच्या गॅलरीत उभे असलेले सागर देशपांडे यांचे वडील यांच्यावर आणि…

  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार :मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न!

    अल्पवयीन मुलीवर अत्याचार :मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न!

    बीड-बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अत्याचारानंतर संबंधित अल्पवयीन पीडितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याघटनेनंतर पीडितेला तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात…

  • बोगस शालार्थ आयडी :एस आय टी ला मुदतवाढ!

    बोगस शालार्थ आयडी :एस आय टी ला मुदतवाढ!

    बीड – नागपूर अमरावती जळगाव येथील शिक्षक भरती मधील शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने नेमण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकाला अर्थात एस आय टी ला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. नागपूर येथे 800 पेक्षा जास्त बोगस शिक्षकांची भरती झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणि या प्रकरणात 22 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी आणि…

  • मिलिया शाळेला दणका!अनधिकृत भागशाळा बंद करण्याचे आदेश!

    मिलिया शाळेला दणका!अनधिकृत भागशाळा बंद करण्याचे आदेश!

    बीड – येथील मिलिया शाळेने गेल्या अनेक वर्षांपासून सुरु केलेली गांधीनगर भागातील अनधिकृत भागशाळा बंद करण्याचे आदेश देत एक लाख रुपयांचा दंड बीडच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ठोठवला आहे. शाळा बंद न केल्यास दररोज दहा हजार रुपये दंड करण्यात येईल असे देखील नोटीस मध्ये म्हटलं आहे. बीड सह जिल्ह्यात अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच कॉलेज…

  • जो कमवून देणार त्यालाच डेपोडेशन मिळणार!जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागातील प्रकार!

    जो कमवून देणार त्यालाच डेपोडेशन मिळणार!जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागातील प्रकार!

    बीड – कोणत्याही कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती अर्थात डेपुटेशन करावयाचे असल्यास विभागीय आयुक्तांची परवानगी लागते मात्र बीड जिल्ह्यात वेगळाच कायदा चालतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या स्टोर कीपर पदावर तसेच जिल्हा रुग्णालयाच्या स्टोर कीपर पदावर प्रतिनियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे जो कमवून देणार त्यालाच क्रीम पोस्ट मिळणार असा फंडा बीडच्या…