News & View

ताज्या घडामोडी

Category: राजकीय

  • महायुतीचा सत्तास्थापनेचा दावा!

    महायुतीचा सत्तास्थापनेचा दावा!

    मुंबई -महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. त्यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने…

  • तो पुन्हा आलाय!देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी एकमताने निवड!!

    तो पुन्हा आलाय!देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी एकमताने निवड!!

    भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदि एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. त्यामुळे तो पुन्हा आलाय मुख्यमंत्री होण्यासाठी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीने मोठं यश मिळवलं. तब्बल 233 जगावर विजय मिळवला. मात्र मुख्यमंत्री कोण…

  • निवडणुकीत जनतेला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न!बहाद्दर जनता माझ्या पाठीशी -संदीप क्षीरसागर!

    निवडणुकीत जनतेला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न!बहाद्दर जनता माझ्या पाठीशी -संदीप क्षीरसागर!

    बीड – माझ्या विरोधातील उमेदवाराने निवडणूक काळात पैशाचा बाजार मांडला, पण बीडच्या बहाद्दर जनतेने माझ्या पाठीशी आशीर्वाद दिले. आता विरोधक पुढचे पाच वर्ष कसा निधी आणता अन कसा विकास करतात अशा धमक्या देत आहेत. पण जनतेच्या विकासासाठी वेळ पडली तर सरकार विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा बीडचे नवनिर्वाचित आ संदीप क्षीरसागर यांनी दिला.मायबाप जनतेने मला…

  • शिंदे यांचा मोठा निर्णय!

    शिंदे यांचा मोठा निर्णय!

    मुंबई -गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेची भरपूर सेवा केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडका भाऊ झालो. ही पदवी मोठी आहे असं म्हणत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली….

  • एकनाथ शिंदे यांचा राजीनामा!

    एकनाथ शिंदे यांचा राजीनामा!

    मुंबई -राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सोबत घेत राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. नवे सरकार स्थापन होईपर्यंत शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे…

  • एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!

    एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!

    बीड -मराठवाड्यात ज्या काही अटीटतीच्या किंवा चूरशीच्या म्हणून लढती होत्या त्यात बीड विधानसभा मतदार संघाची लढत होती. विद्यमान आ संदीप क्षीरसागर विरुद्ध बंधू डॉ योगेश क्षीरसागर अशा लढतीत वडील, भाऊ, काका, सगळे नातेवाईक, पालकमंत्री, सरकार विरोधात असतानाही संदीप क्षीरसागर यांनी मोठा विजय मिळवला. रक अकेला शेर बाकी सब ढेर अशा पद्धतीने आ संदीप क्षीरसागर यांचा…

  • शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!

    शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!

    बीड -बीड विधानसभा मतदारसंघात दोन भावात लढत होणार आहे. या दोघात कोण बाजी मारणार याची चर्चा गेल्या दोन दिवसापासून सुरु आहे. बीड मतदारसंघात शहरात 98 हजार तर ग्रामीण भागात एक लाख चाळीस हजार मतदान झाले आहे. बीड मतदारसंघात विद्यमान आ संदीप क्षीरसागर आणि फोन योगेश क्षीरसागर या दोघात लढत झाली. अपक्ष उमेदवार अनिल जगताप, ज्योती…

  • पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!

    पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!

    बीड -जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठवण वाजेपासून सुरु होईल, पहिला निकाल परळीचा तर सर्वात शेवटचा निकाल आष्टी मतदार संघाचा लागेल अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी पार पडली. बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. पाच ते सहा ठिकाणी…

  • घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!

    घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!

    परळी -परळी विधानसभा मतदारसंघात घाटनांदूर या ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांनी इव्हीम मशीनची तोडफोड करण्यात आली. या घटनेप्रकरणी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या ठिकाणच्या मशीनमधील मत सुरक्षित आहेत, मतदारांनी शांततेत मतदान करावे असे आवाहन पाठक यांनी केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदानास सकाळी सात वाजेपासून सुरवात झाली. बीड जिल्ह्यात दुपारी तीन…

  • आ क्षीरसागर यांची बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल!

    आ क्षीरसागर यांची बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल!

    बीड – विधानसभा निवडणुकीत प्रचार थांबल्यानंतर बीड विधानसभा मतदार संघांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांचा फोटो आणि समोर ट्रम्पेट हे चिन्ह छापून बदनामी केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बीड विधानसभा निवडणुकीत 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानंतर शहरातील गांधीनगर भागात काही लोक एक उर्दू भाषेत छापलेले पत्रक वाटतं असल्याचे…