Category: परळी
-
परळी रेल्वे स्टेशन पुनर्विकासासाठी 25 कोटी!
मुंबई-विदर्भातील गोंदिया ते बल्हारशाह या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी ४,८१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सोबतच बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानकासह राज्यातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.विश्व वारसा स्थळ म्हणून घोषित असलेल्या मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील यात समावेश आहे. पुनर्गस होणाऱ्या रेल्वेस्थानकांमध्ये छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्थानक तसेच…
-
राखेच्या हायवाने उडवले, सरपंचाचा मृत्यू!
परळी -परळी: राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकी स्वराला उडविले अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाल्याची घटना परळी तालुक्यातील मिरवट येथे घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा परळी मधील अवैध राख वाहतुकीचा मुद्दा चर्चेत आला आहे. बीडच्या परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने मोटरसायकल स्वाराला उडविले आहे. या अपघातात परळी तालुक्यातील सौंदाना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच…
-
वाढत्या गुन्हेगारीबद्दल पंकजा मुंडे भेटणार फडणवीसांना!
मुंबई -बीड जिल्ह्यात दिवसाढवळ्या झालेली सरपंचांची हत्या असो कि परळीतील व्यापाऱ्याचे अपहरण असो, बीड जिल्ह्यात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत आ पंकजा मुंडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दोन दिवसापूर्वी केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. तसेच…
-
परळीचे व्यापारी अमोल डुबे यांचे दोन कोटीसाठी अपहरण!
परळी -केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंचांच्या हत्येला बारा तास होतं नाहीत तोच एक खळबळजनक घटना परळीतून समोर आली आहे. शहरातील व्यापारी अमोल विकास डुबे यांचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. अंबाजोगाई -परळी रस्त्यावरील घाटात त्यांच्याकडून चार लाख रोख आणि दहा तोळे सोने घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. परळीचे माजी नगराध्यक्ष व पेट्रोल पंपाचे मालक…
-
घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
परळी -परळी विधानसभा मतदारसंघात घाटनांदूर या ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांनी इव्हीम मशीनची तोडफोड करण्यात आली. या घटनेप्रकरणी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या ठिकाणच्या मशीनमधील मत सुरक्षित आहेत, मतदारांनी शांततेत मतदान करावे असे आवाहन पाठक यांनी केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदानास सकाळी सात वाजेपासून सुरवात झाली. बीड जिल्ह्यात दुपारी तीन…
-
परळीसह जिल्ह्यात गुंडगिरी वाढली!पक्ष फोडणाऱ्यांना हद्दपार करा -शरद पवारांचा धनंजय मुंडेवर हल्लाबोल!
परळी -बीड जिल्ह्यात विशेषतः परळी मध्ये गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्यापारी हैराण झाले आहेत. दहशतिखाली वावरत आहेत. ज्यांना संकट काळात साथ दिली त्यांनी पक्ष फोडण्यासाठी पुढाकार घेतला असं म्हणत अशा लोकांना सत्तेतून हद्दपार करा अन राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा असे आवाहन खा शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद…
-
त्यांच्या नेत्यांचं लग्न होईना अन हे मतदारसंघातील पोरांना आश्वासन देऊ लागले -मुंडेचा टोला!
अंबाजोगाई -माझ्याविरोधात उभे असलेल्या उमेदवारांच्या नेत्याला लग्नासाठी पोरगी मिळतं नाहीये अन हे मतदारसंघातील मुलांचे लग्न लावून देण्याच्या बाता मारत आहेत असं म्हणत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी उमेदवाराची खिल्ली उडवली. धनुभाऊ तुम्ही राज्यात फिरा आम्ही तुमच्या विजयासाठी मेहनत घेतो असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. परळी मतदारसंघाच्या अंबाजोगाई तालुक्यातील राडी जिल्हा परिषद गटात विविध गावांमध्ये…
-
आईचं औक्षण, वडील, काकांचे दर्शन अन लाडक्या बहिणींच्या साक्षीने धनंजय मुंडेनी भरला अर्ज!
परळी -राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या आईकडून औक्षण करून घेत वडील पंडितरावं मुंडे, काका गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीच दर्शन घेत प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करत लाडक्या बहिणी पंकजा अन प्रीतम यांच्या साक्षीने विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.जनतेची सेवा अखंडपणे सुरु आहे, त्यामुळे जनता आपल्या पाठीशी आशीर्वाद उभा करेल असा विश्वास त्यांनी…
-
एक चिराग हजारो आंधीयों पे भारी है -धनंजय मुंडे!
छत्रपती संभाजीनगर -दुवा करो के सलामत रहे मेरी हिम्मत, ये एक चिराग हजारो आंधीयों पे भारी है असं म्हणत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न सुरु आहे मात्र त्यांना माहित नाही मी धनंजय आहे, मला चक्रव्युव्ह भेदणं चांगल माहित आहे अशी गर्जना मुंडे यांनी केली. संभाजीनगर…
-
डी एम ऑन फिल्ड!दत्ताचे आशीर्वाद घेत प्रचाराचा शुभारंभ!
परळी – प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ ज्या दत्त मंदिरापासून केला जातो त्याच बागझरी येथील दत्ताचे आशीर्वाद घेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. राज्यातील बहुतांश उमेदवार आपल्या उमेदवारीसाठी पक्षांकडे उंबरे झिजवत असताना डीएम मात्र पचाराच्या फिल्डवर उतरले आहेत. मला संपवण्याची भाषा करणाऱ्यांना मतदानातून उत्तर द्या असे आवाहन त्यांनी यावेळी…