News & View

ताज्या घडामोडी

Category: गेवराई

  • सिंदफणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता!

    सिंदफणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता!

    बीड -जिल्ह्यातील शिरूर आणि गेवराई तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या सिंदफना नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब कोल्हापूर पध्दतीच्या बंधारे प्रकल्पाचे बॅरेजमध्ये रुपांतरीत करण्याच्या कामास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवर सुमारे 30 ते 35 वर्षापूर्वी…

  • ईदच्या पूर्वसंध्येला गेवराईत मस्जिदमध्ये स्फोट!

    ईदच्या पूर्वसंध्येला गेवराईत मस्जिदमध्ये स्फोट!

    गेवराई -उरूस मिरवणुकीत झालेल्या वादानंतर गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मस्जिद मध्ये जिलेटिन च्या सहाय्याने स्फोट घडवण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे. हा स्फोट नेमका का घडवला, याचं कारणही पोलिसांनी शोधून काढलं आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी याबाबतची माहिती…

  • गेवराईच्या छत्रपती मल्टीस्टेट कडून फसवणूक!

    गेवराईच्या छत्रपती मल्टीस्टेट कडून फसवणूक!

    बीड -दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आणि राज्याच्या कानकोपऱ्यात शाखांचे जाळे उभारून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा केलेल्या छत्रपती मल्टीस्टेट कडून ग्राहकांची फसवणूक झाली आहे. याबाबत अनेक ग्राहकांनी बीड आणि गेवराई च्या न्यायालयात धाव घेतली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. बीड जिल्ह्यात गेल्या वर्ष दीड वर्षांपासून जिजाऊ मा साहेब, ज्ञानराधा, साईराम सारख्या अनेक मल्टीस्टेट, पतसंस्था बंद पडल्या….

  • सुनबाई जोमात विरोधक कोमात!

    सुनबाई जोमात विरोधक कोमात!

    गेवराई -महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्यासाठी कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण पंडित कुटुंब प्रचारात उतरले आहे. अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित, विजयसिंह पंडित, विजया पंडित यांच्यासोबत आता सुनबाई श्रावणी पंडित यांनी देखील प्रचारात उडी घेतली आहे. पंडितांच्या डोअर टू डोअर प्रचाराने विरोधक मात्र कोमात गेले आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार रंगात आला…

  • जामिनावर सुटताच गर्भपाताचा धंदा सुरू ! गेवराईत मोठ्या कारवाईने खळबळ !!

    जामिनावर सुटताच गर्भपाताचा धंदा सुरू ! गेवराईत मोठ्या कारवाईने खळबळ !!

    गेवराई- काही महिन्यांपूर्वी गेवराई शहरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात अटक होऊन जामिनावर सुटलेल्या नर्सने पुन्हा तोच उद्योग सुरू केला.जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कारवाईने हा काळा धंदा गुरुवारी पुन्हा एकदा उघडकीस आला. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे जिल्ह्यात आजही अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. गेवराई शहरातील…

  • निलंबित कर्मचाऱ्याचा मृत्यू ! नातेवाईकांनी मृतदेह आणला नगर पालिकेत !

    निलंबित कर्मचाऱ्याचा मृत्यू ! नातेवाईकांनी मृतदेह आणला नगर पालिकेत !

    गेवराई – नगर पालिकेतील कर्मचारी सोमनाथ राऊत यांना विना चौकशी निलंबित करून सन २०२० पासून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. पुन्हा नोकरीवर रुजू करून घेण्याची मागणी निलंबित कर्मचाऱ्याने वारंवार पालिकेकडे केली. मात्र राजकीय दबावापोटी त्यांना नोकरीवर रुजू करून घेण्यात आले नसल्याचा गंभीर आरोप मयत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी केला. गुरुवारी त्यांचे आजाराने निधन झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह थेट…

  • 2022 च्या अनुदान वाटपास सुरुवात !

    2022 च्या अनुदान वाटपास सुरुवात !

    बीड- राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाने सप्टेंबर- ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसान आणि माहे मार्च एप्रिल 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसानापोटी बीड जिल्ह्यातील 8 लाख 29 हजार 511 बाधित शेतकरी लाभार्थ्यांना रुपये 622.57 कोटी अनुदान मंजूर झाले असून सदर अनुदानाचे संगणकीय प्रणाली…

  • पती पत्नीने गळफास घेत संपवलं जीवन !

    पती पत्नीने गळफास घेत संपवलं जीवन !

    गेवराई- तालुक्यातील जातेगाव येथील बंडू चव्हाण आणि सोनाली चव्हाण या दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. बीड जिल्ह्यातील जातेगाव येथे सुरू असलेल्या उपोषणात सहभागी पती-पत्नी अचानक घरी गेले. यानंतर त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या…

  • कोणीतरी कानात सांगितले अन पवार साहेबांनी माझ्यावर टिका केली -अमरसिंह पंडित !

    कोणीतरी कानात सांगितले अन पवार साहेबांनी माझ्यावर टिका केली -अमरसिंह पंडित !

    बीड- शरद पवार यांचा फोटो आमच्या देवघरात आहे,मात्र 17 तारखेच्या सभेत त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा अन माझ्यावर टीका केली.सभेपुर्वी कोणीतरी त्यांच्या कानात सांगितले अन ते माझ्याबद्दल बोलले.होय मी अजित पवार यांचा कार्यकर्ता आहे अस ठासून सांगत अमरसिंह पंडित यांनी शरद पवार यांना उत्तर दिलं. बीड येथे आयोजित सभेत अमरसिंह पंडित यांनी आपल्या भाषणात शरद…

  • माजीमंत्री बदामराव पंडितांच्या घरी शरद पवारांची खलबते !

    माजीमंत्री बदामराव पंडितांच्या घरी शरद पवारांची खलबते !

    गेवराई- माजीमंत्री तथा शिवसेना नेते बदामराव पंडित यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजी नगर वरून बीडला येताना भेट दिली.यावेळी पवार आणि पंडित यांच्यामध्ये गुप्त खलबते झाली.माजी आ अमरसिंह पंडित यांनी अजित पवार यांची साथ दिल्याने पवारांनी बदामराव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर…