Category: आर्थिक
-
राज्याचा तुटीचा अर्थसंकल्प सादर!
मुंबई -राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 45 हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी, महिला, बेरोजगार, विद्यार्थी, उद्योजक यांच्यासाठी वेगवेगळ्या घोषणा यामध्ये करण्यात आल्या.सन 2025-26 च्या अर्थसकंल्पामध्ये एकूण खर्चासाठी 7 लाख 20 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सन 2025-26 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 5 लाख 60 हजार 964 कोटी रुपये व महसुली खर्च…
-
ज्ञानराधा मधील पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा!
बीड -महाराष्ट्र सह इतर राज्यात तब्बल 53 शाखाच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांच्या ठेवी गोळा करून वेळेवर परत न करता ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील ठेवी लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरेश कुटे यांच्या मालमत्ता विक्रीबाबत कारवाई ला परवानगी देण्याची मागणी केली असून ही परवानगी मिळाल्यास येत्या काही महिन्यात ठेवी परत मिळण्याची…
-
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी!
नवी दिल्ली -सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या आठव्या वेतन आयोगाची अंमलाबजावणी करण्याच्या शिफारसी ला मंजुरी देण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांनंतर म्हणजेच 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ होणार आगे. सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल. तसेच कर्मचाऱ्यांशी…
-
फरार चंदूलाल बियाणीला अटक!
अंबाजोगाई -राजस्थानी मल्टीस्टेट पटसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा अपहार करून मागील वर्षभरापासून फरार असलेल्या चंदूलाल बियाणी याने आज अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पतकरली. बियाणी याने ठेवीदारांच्या तब्बल चारशे कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. वाढीव व्याजदाराचे आमिष दाखवून शेकडो ठेवीदारांच्या ठेवी हडप केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चंदूलाल बियाणी यांनी आज सोमवारी (दि.02) अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पत्करली. ज्ञानराधा मल्टीस्टेट…
-
रामकृष्ण बांगर यांना अटक!
बीड – महानंद डेअरीचे माजी चेअरमन सहकार आणि शिक्षण क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या रामकृष्ण बांगर यांना वाशिम येथून पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून अपहार प्रकरणात फरार होते. पाटोदा तालुक्यातील महात्मा फुले अर्बन बँक, वेगवेगळ्या सहकारी सोसायटी, शाळा संस्थांमध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी रामकृष्ण बांगर, त्यांच्या पत्नी सत्यभामा बांगर, मुलगा…
-
कुटेची एक हजार कोटीची संपत्ती जप्त!
बीड – राज्यसह परराज्यात शाखांचे जाळे उभारून चार लाख ठेवोदरांच्या साडेतीन हजार कोटींच्या ठेवीवर दरोडा घालणाऱ्या सुरेश कुटे याच्या एक हजार कोटीच्या मालमत्तेवर ईडी ने जप्ती केली आहे. कुटे याने ठेवीदारांचा पैसा स्वतःच्या उद्योगात रोखीच्या स्वरूपात वापरला असे स्पष्ट झाल्याने मनी लॉंड्रीन्ग आणि एमपीआयडी नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे कुटेच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत….
-
सहकार सम्राट बांगर अडचणीत, बायकोला अटक!
बीड -बीड जिल्ह्यासह राज्यभरात सहकार सम्राट नावाने ओळख असलेल्या रामकृष्ण बांगर यांचा खरा चेहरा उघडं होतं आहे. महात्मा फुले अर्बन बँकेसह चौदा सहकारी संस्था मध्ये चौदा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडं झाले आहे. बांगर यांच्यासह 41लोकांवर गुन्हे दाखल झाले असून सत्यभामा बांगर यांना अटक झाली आहे. रामकृष्ण बांगर, सत्यभामा बांगर, बाळा बांगर यांनी महात्मा फुले…
-
ईडी ची कुटेवर कारवाई, 95कोटी जप्त!
ईडी कडून ज्ञानराधा मल्टीस्टेटची 95 कोटींची संपत्ती जप्त बीड,छत्रपती संभाजीनगर,पुणे,मुंबई येथील मालमता जप्त बीड – ईडी कडून ज्ञानराधा मल्टीस्टेटची 95 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आलीये.जास्तीच्या व्याजाचे आमिष दाखवून ज्ञानराधा मल्टिस्टेटने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर जाळे पसरलेले आहे. गेल्याप वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले…
-
बबन शिंदे जेरबंद!
बीड -शेकडो कोटी रुपयांचा अपहार करून फरार असलेल्या जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट चा अध्यक्ष बबन शिंदे याला वृंदावन येथून जेरबंद केले आहे. गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून शिंदे फरार होता. बीड सह जिल्ह्यात पाच ठिकाणी शाखांचे जाळे उभारून शिंदे याने तीनशे कोटिपेक्षा अधिकच्या ठेवी गोळा केल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी मल्टीस्टेट बंद करून तो फरार झाला….
-
‘ज्ञानराधा’साठी लिक्विडेटर नेमण्याचे केंद्र सरकारचे आदेश!
नवी दिल्ली -बीडच्या ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात अनेक छोट्या गुंतवणूकदारांच्या आणि शेतकरी सभासदांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींची गंभीर दखल केंद्र सरकारने लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. ‘ज्ञानधारा’मुळे शेतकरी, कामगार, कष्टकरी, छोटे व्यापारी असे ग्रामीण भागातील गुंतवणूकदार अडचणीत आहेत….