Category: महाराष्ट्र
-

देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे, पवारांचा शपथविधी!
मुंबई -देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील 18 मुख्यमंत्री, मुकेश अंबानी, शाहरुख खान यांच्यासह संत महंत आणि हजारो लाडक्या बहिणींच्या साक्षीने राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21 वे मुख्यमंत्री बनले…
-

महायुतीचा सत्तास्थापनेचा दावा!
मुंबई -महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. त्यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने…
-

तो पुन्हा आलाय!देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी एकमताने निवड!!
भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदि एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. त्यामुळे तो पुन्हा आलाय मुख्यमंत्री होण्यासाठी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीने मोठं यश मिळवलं. तब्बल 233 जगावर विजय मिळवला. मात्र मुख्यमंत्री कोण…
-

शिंदे यांचा मोठा निर्णय!
मुंबई -गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेची भरपूर सेवा केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडका भाऊ झालो. ही पदवी मोठी आहे असं म्हणत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.…
-

बांधकाम विभागाच्या शिंदेचे प्रमोशन वादात!
बीड -सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिंदे यांना काही दिवसापूर्वी पदोन्नती मिळाली, मात्र स्व आ विनायक मेटे यांच्यापासून अनेक लोकप्रतिनिधी च्या तक्रारी असताना शिंदे यांना प्रमोशन कस मिळाले अशी चर्चा सुरु झाली असून मुख्य अभियंता यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. बीडच्या सार्वजनिक बांधकामं विभागात कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे असोत कि उपाभियंता चंद्रकांत बोराडे सगळे…
-

एकनाथ शिंदे यांचा राजीनामा!
मुंबई -राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सोबत घेत राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. नवे सरकार स्थापन होईपर्यंत शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे…
-

शाळांना तीन दिवस सुट्टी!
मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना सोमवार ते बुधवार अशी सलग तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शाळेतील शिक्षकांना निवडणुकीत ड्युटी लागली आहे त्या शाळा थेट गुरुवारी उघडणार आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची…
-

परळीसह जिल्ह्यात गुंडगिरी वाढली!पक्ष फोडणाऱ्यांना हद्दपार करा -शरद पवारांचा धनंजय मुंडेवर हल्लाबोल!
परळी -बीड जिल्ह्यात विशेषतः परळी मध्ये गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्यापारी हैराण झाले आहेत. दहशतिखाली वावरत आहेत. ज्यांना संकट काळात साथ दिली त्यांनी पक्ष फोडण्यासाठी पुढाकार घेतला असं म्हणत अशा लोकांना सत्तेतून हद्दपार करा अन राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा असे आवाहन खा शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद…
-

परळीतून राजाभाऊ फड यांची माघार तर बीडमध्ये अनिल जगताप लढणार!
बीड – विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून राजाभाऊ फड यांनी माघार घेतली आहे तर दुसरीकडे बीड मतदार संघातून अपक्ष म्हणून अनिल जगताप लढणार आहेत, माजीमंत्री सुरेश नवले यांनी देखील माघार घेतली आहे. बीडमध्ये अनिल जगताप, ज्योती मेटे आणि कुंडलिक खांडे यांनी आपले अर्ज कायमच ठेवले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मोठमोठ्या उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक…
-

जयदत्त क्षीरसागर यांची माघार!
बीड -माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अचानक त्यांनी हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे. बीड विधानसभा निवडणुकीत तीन क्षीरसागर एकमेकांसमोर उभे राहिल्याने काय होणार याकडे सर्वांचे लक्ष होते.दोन पुतणे अन एक काका यांच्यात मताचे विभाजन होणार हे नक्की होते. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी…



