News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • बीडकरांनी अनुभवला शिवजयंती चा उत्साह !

    बीडकरांनी अनुभवला शिवजयंती चा उत्साह !

    बीड – चित्तथराक प्रात्यक्षिक, शिवकालीन मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, महाराषट्रातील विविध भागातील ढोल पथक, केरळ ची पुरातन युद्धकला, आंतराष्ट्रीय दर्जाच्या लेजर-शो च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी जीवनपट बिडकरांच्या डोळ्यासमोर उभा राहिला.आ संदिप क्षीरसागर यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वस्व असल्याचे मत व्यक्त केले.    दरवर्षीप्रमाणे बीडकरांना शिवजयंती च्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली….

  • राष्ट्रवादी चे सर्व आमदार पात्र !

    राष्ट्रवादी चे सर्व आमदार पात्र !

    मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व आमदार पात्र असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.हा निकाल देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिल्याचा उल्लेख करत अध्यक्षांनी हा निकाल दिला. विधिमंडळात असलेले बहुमत याच्या आधारे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नार्वेकर देखील याचा आधार…

  • नाली साफ करताना जेसीबीच्या खोऱ्यात बाहेर आला मृतदेह !

    नाली साफ करताना जेसीबीच्या खोऱ्यात बाहेर आला मृतदेह !

    बीड- शहरातील सुभाष रोड,माळीवेस भागात नाल्यांची साफसफाई सुरू असताना जेसीबीच्या खोऱ्यात चक्क मानवी मृतदेह आल्याने खळबळ उडाली.पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे. बीड नगर पालिकेच्या माध्यमातून शहरातील नाल्यांची स्वच्छता मोहीम सध्या सुरू आहे.बीड शहरातील सुभाष रोडवर असलेल्या नेहरू नगर च्या मोठ्या नाल्याची जेसीबी मार्फत साफसफाई सुरू होती. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या खोऱ्यात…

  • अशोक चव्हाण,मेधा कुलकर्णी, अजित गोपच्छडे यांना भाजपची उमेदवारी !

    अशोक चव्हाण,मेधा कुलकर्णी, अजित गोपच्छडे यांना भाजपची उमेदवारी !

    मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तिघांना उमेदवारी जाहीर केली आहे.काँग्रेस मधून भाजपवासी झालेले अशोक चव्हाण, माजी आ मेधा कुलकर्णी आणि नांदेड चे अजित गोपच्छडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी देशभरातील 56 राज्यसभा उमेदवारासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र मधून 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यातील सत्ताधारी…

  • अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश !

    अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश !

    मुंबई-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण आणि माजी आ अमरनाथ राजूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपमध्ये घाऊक प्रवेश सुरू झाले आहेत.काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अनेकवेळा येत होत्या.अखेर त्यावर शिक्कामोर्तब…

  • अशोक चव्हाण,चंद्रकांत हंडोरे,नसीम खान भाजप वासी !

    अशोक चव्हाण,चंद्रकांत हंडोरे,नसीम खान भाजप वासी !

    मुंबई- गेल्या अनेक महिन्यापासून ज्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आपल्या समर्थक अकरा आमदारांसह आज सायंकाळी भाजप प्रवेश करणार आहेत.माजीमंत्री नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे हे देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अशोक चव्हाणांसह चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान हे देखील भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते…

  • शिंदे असो की बोराडे,प्रत्येकाचेच सॉफ्टटेक वर विशेष प्रेम !

    शिंदे असो की बोराडे,प्रत्येकाचेच सॉफ्टटेक वर विशेष प्रेम !

    बीड- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीड कार्यालयात शाखा अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी बोगस बिल सादर करून करोडो रुपये छापले. याचा एक नमुना म्हणजे बांधकाम विभागात अद्ययावत कॉम्प्युटर सिस्टीम आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असताना सॉफ्टटेक कॉम्प्युटर आणि सॉफ्टटेक पॉवर या फर्मवर दिवसाला किमान दोन लाख रुपये उधळण्यात आले आहेत.या नावावर दरवर्षी करोडो रुपये उचलून हे…

  • शरद पवारांच्या पक्षाचं नाव ठरलं !

    शरद पवारांच्या पक्षाचं नाव ठरलं !

    नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर शरद पवार यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नवे नाव दिले आहे.अद्याप चिन्ह मिळालेले नाही . शरद पवार यांच्याकडून ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला नवे नाव…

  • राष्ट्रवादी अजित पवारांची!शरद पवार यांना मोठा धक्का !

    राष्ट्रवादी अजित पवारांची!शरद पवार यांना मोठा धक्का !

    नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवार यांच्याकडे राहतील असा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. सहा सात महिन्यांपूर्वी अजित पवार आणि त्यांच्या चाळीस सहकारी आमदारांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काका पुतण्या मध्ये मोठा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला….

  • मंदार पत्की यवतमाळ चे सीईओ !

    मंदार पत्की यवतमाळ चे सीईओ !

    मुंबई- राज्य शासनाने 17 आयएएस आणि 43 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.यात बीडचे सुपुत्र मंदार पत्की यांना यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे,बीडचे पूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची कोल्हापूर येथून बदली झाली असून अमोल येडगे यांना कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. नितीन पाटील (IAS:MH:2007) विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र,…