Category: महाराष्ट्र
-

माजी आ आर टी देशमुख ठार!
बीड – माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. अंबाजोगाई लातूर महामार्गांवर हा भीषण अपघात झाला. आर टी देशमुख हे औसा येथून परत येतं असताना बेळकुंड नजिक त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. अक्षरशः चेंदामेंदा झालेल्या गाडीत देशमुख यांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बीड जिल्हा…
-

बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ!
वैशाली जामदार यांनी मराठवाड्यात बोगस शिक्षक भरतीला मदत केल्याची माहिती उघड! नागपूर -बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांनी नागपूर येथे कार्यरत असताना 211 शिक्षकांना शालार्थ आयडी दिल्याची माहिती समोर आली आहे. जामदार या छत्रपती संभाजीनगर येथे असताना देखील त्यांनी बोगस शिक्षक भरतीसाठी मदत केल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच्या…
-

नागपूर घोटाळा प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी यांना अटक!
बीड – नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी वैशाली जामदार यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. जामदार यांच्या अटकेमुळे बीडच्या भरतीची देखील चौकशी रडारवर आली आहे. नागपूरमध्ये शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा तपास वेगाने सुरू असून या प्रकरणात अटकसत्र वाढत आहे. राज्यभर खळबळ उडवणाऱ्या या घोटाळ्यात आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली…
-

शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!
नागपूर -बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आणणारे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनाच या प्रकरणात अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर प्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक भरती घोटाळा झाला असून याची देखील चौकशी सुरु झाल्याने संस्थाचालकांचे धाबे दनानले आहेत. नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन…
-

राज्याच्या राजकारणात भूकंप!
शरद पवारांचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बॅनरमुळे एकत्रिकरणावर शिक्कामोर्तब! बीड – अडीच वर्षांपूर्वी वेगळे झालेले आणि मागील महिनाभरापासून एकत्रिकरणाची चर्चा सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे जाहिर आभार मानले आहेत. बीड शहराच्या वेगवेगळ्या भागात आ क्षीरसागर यांनी लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले…
-

नागनाथ शिंदे, फुलारीनी केला पाचशे कोटींचा घोटाळा!
शिक्षण आयुक्तांचे चौकशीचे आदेश! संस्थाचालकांवर देखील होणार कारवाई! बीड -बीड जिल्ह्यात 2012 ते 2019 आणि गेल्या तीन वर्षात देखील मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक आणि कर्मचारी भरती करण्यात आली. न्यूज अँड व्यूज ने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. काही संस्थाचालकांनी उपसंचालक कार्यालयापासून ते मंत्रालय पर्यंत फिल्डिंग लावली. मात्र बकरे कि माँ कब तक दुवा मांगेगी या पद्धतीने…
-

आदित्य, तुलसी, वसंतराव काळे सहित 233 महाविद्यालयांना प्रवेश बंदी!
बीड -बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून संलग्नित असलेल्या 233 महाविद्यालयांना 2025- 26 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला निर्बंध घालण्यात आलेले असून या महाविद्यालयांनी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत यामुळे संलग्निकरण यादीतील 484 महाविद्यालयापैकी 233 महाविद्यालयात या नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही.विद्यापीठाकडून महाविद्यालयावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शैक्षणिक…
-

बोगस शिक्षक प्रकारणाची न्यायालयीन चौकशी होणार!
शिक्षकांचे एरियर्स सहकारी बँकातून विड्रॉल! बीड – नागपूर येथील बोगस शिक्षक भरती प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्य सरकारने 2012 ते 2019 या काळात राज्यात झालेल्या भरतीची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकारणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली आहे.…
-

राज्यात नवे वाळू धोरण!
मुंबई -राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृत्रिम सॅन्ड अर्थात वाळू विक्रीच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली. यापुढे प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती किंवा संस्थांना एम सॅन्ड युनिट स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती/ संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगविभाग सवलत देण्यात येणार आहे. तसेच एम-सँड तयार करणार्या युनिटला २०० रुपये…
-

टोलमाफी ते पीकविमा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय!
मुंबई -राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. इलेक्ट्रिक वाहनाना टोलमाफी पासून ते पीकविमा योजनेतील बदलाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सरकारने मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित पीकविमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच सरकारने ईलेक्ट्रिक व्हेइकल्सचा वापर वाढावा यासाठी काही पावलं उचलली आहेत. सरकारच्या नव्या निर्णयाअंतर्गत इलेक्ट्रिक व्हेइकल्सना काही टोलनाक्यांवर टोलमाफी दिली जाणार आहे.…



