Category: महाराष्ट्र
-
मोहोळ हत्याकांडात दोन वकिलांचा सहभाग !
आठवडाभरापासून प्लॅनिंग, मामा ने केला गेम ! पुणे- कुख्यात डॉन शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी अवघ्या आठ तासात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना जेरबंद केले आहे.या आरोपींमध्ये दोन वकिलांचा समावेश आहे.अवघ्या महिना भरापूर्वी गँग मध्ये सहभागी झालेल्या मुन्ना पोळेकर ने मामा च्या सांगण्यावरून हा गेम वाजवला.दोन वकिलांनी आठवडाभरपासून याचे प्लॅनिंग केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या…
-
विधानसभा निवडणूक लढवणारच – अनिल जगताप !
सुषमा अंधारेमुळे उबाठा सेनेची अंधार सेना झाली ! दहा जिल्ह्यात लवकरच उबाठा सेनेला धक्के बसणार ! बीड- गेल्या चाळीस वर्षांपासून निष्ठेने काम केल्यावर जर आपल्यावर अन्याय होत असेल तर किती दिवस त्रास सहन करायचा.काहीही झालं तरी आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत अस सांगत अनिप जगताप यांनी उबाठा सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका…
-
अनिल जगताप यांचा शिवसेना उबाठा गटाला जय महाराष्ट्र !
बीड- गेल्या तीस चाळीस वर्षांपासून एकनिष्ठेने शिवसेनेची धुरा खांद्यावर घेऊन काम करणारे बीडचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र केला आहे.पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.9 जानेवारी रोजी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहोत असे त्यांनी जाहीर केले. बीड जिल्ह्यात विद्यार्थी दशेपासून शिवसेनेचे काम करत असलेले अनिल जगताप यांच्यावर…
-
नगर पालिकेत दररोज दिल्या जातात बोगस पावत्या !
अमोल शिंदे आणि सहकारी रोज कमावतात किमान दोन लाख रुपये ! बीड- बीड नगर पालिकेत नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या विविध कराच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर गडबड घोटाळा केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. वसुली विभागातील अमोल शिंदे आणि त्याच्या काही साथीदारांनी बोगस पावत्या आधारे किमान एक ते दोन कोटींचा अपहार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.विशेष म्हणजे हे…
-
आदर्श महिला नागरी बँकेचे लायसन रद्द !
नवी दिल्ली- छत्रपती संभाजी नगर अर्थात औरंगाबाद येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचे लायसन आरबीआय ने रद्द केले आहे.बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून ठेवीदारांना पाच लाखापर्यंत ठेवी परत मिळणार आहेत.या बँकेत 200 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला होता. जास्त व्याजाचे आमिष दाखवून छत्रपती संभाजी नगर येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेने गेल्या काही वर्षात…
-
अंधारेच्या राज्यात नगर पालिकेत अंधार !
बीड- एक जिल्हाधिकारी त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या तलाठ्याच्या घरी कार्यक्रमाला सहकुटुंब जातात,तलाठ्याचा थाट पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी यांची पत्नी विचारते की अहो तुम्ही तलाठी का नाही झालात, अर्थात तलाठ्याच ऐश्वर्य पाहून जिल्हाधिकाऱ्यांचे डोळे दिपतात,अशीच अवस्था बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे पाहिल्यावर कोणत्याही क्लास वन अधिकाऱ्यांची होईल. बीड नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर नीता अंधारे यांनी ज्या…
-
सुनील केदार यांची आमदारकी रद्द !
नागपूर- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावलेले काँग्रेस चे आ सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले होते, त्यानंतर केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात गेला. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द…
-
20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण – जरांगे पाटील यांचा सरकारला ईशारा !
बीड- सरकारने आरक्षण लवकर दिलं नाही तर 20 जानेवारी पासून मुंबईत मी स्वतः आमरण उपोषण करणार असा इशारा मराठा आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.बीड येथे आयोजित इशारा सभेत त्यांनी सरकार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले. बीड येथे आयोजित इशारा सभेपुर्वी जरांगे पाटील यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सभास्थळापर्यंत भव्य दिव्य…
-
शहरातील शाळा उद्या बंद ! शिक्षणाधिकारी शिंदेंचा तुघलकी निर्णय !!
बीड- जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक काढलेल्या एका आदेशामुळे पालक वर्ग संभ्रमात पडला आहे.शनिवारी शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिंदे यांनी काढल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. दोन्ही विभागाचा पदभार सांभाळणारे शिक्षणाधिकारी शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की,23/12/2023 रोजी बीड शहरातील सर्व शाळा बंद…
-
स्वेच्छा निवृत्ती घेतली एकाने नोकरी दिली दुसऱ्याला ! बीड नगर पालिकेचा भोंगळ कारभार !!
बीड- बीड नगर पालिकेत भोंगळ कारभार सुरू असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे.एखाद्या कर्मचाऱ्याने स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर अनुकंपा प्रमाणे वारसांना नोकरीचा लाभ मिळत नाही मात्र बीड नगर पालिकेने चक्क हा लाभ दिला आणि तो ही रक्ताच्या नात्याचा संबंध नसलेल्या व्यक्तीला. नगर पालिकेतील शेख खमरोद्दीन या कर्मचाऱ्याने स्वेच्छा निवृत्ती घेतली .त्यानंतर नगर पालिकेने प्रदीप वडमारे या व्यक्तीला…