Category: महत्त्वाच्या
-
माजलगावात प्रकाश दादा, पुतण्याचा पत्ता कट!
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामध्ये माजलगाव मधून पुतण्या जयसिंह ऐवजी काका प्रकाश सोळंके यांनाच उमेदवारी मिळाली आहे. परळीतून धनंजय मुंडे यांचे नाव फायनल झाले आहे मात्र गेवराई आणि आष्टी बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अजित पवार गटाकडून 38 उमदेवार घोषित करण्यात आले. यामध्ये बहुतांश विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहिर…
-
निवडणूक कामात हलगर्जीपणा!दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा!
जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा दणका! विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरु असताना आपले कर्तव्य सोडून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती सूत्रांनी न्यूज अँड व्यूजला दिली आहे.जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या दोघांवर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.अक्षय भागवत आणि अकबर पटेल अशी त्या दोघांची नावे आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक जाहिर…
-
बीडचा निर्णय वेटिंगवर!शिवसेनेची पहिली यादी जाहिर!
मुंबई -राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहिर केली आहे. विशेष बाब म्हणजे या यादीत मराठवाड्यातील अनेक जागा जाहिर केल्या असल्या तरी बीड बाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही जागा सेना लढवणार कि अजित पवार हा सस्पेन्स कायम आहे. भाजपने दोन दिवसापूर्वी आपली पहिली यादी जाहिर केली. त्यानंतर अजित…
-
मुंडे बंधू -भगिनींची पवारांशी खलबत!
मुंबई -भाजपच्या आ पंकजा मुंडे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी रात्री साडेअकरा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन चर्चा केली. बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, गेवराई या मतदार संघात कोण उमेदवार द्यायचा याबाबत या तिघांत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३…
-
केजमधून नमिता मुंदडा!भाजपच्या पहिल्या यादीत 99 जणांना संधी!
मुंबई -भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहिर केली आहे. ज्यामध्ये बीड जिल्ह्यातून केज मध्ये विद्यमान आ नमिता मुंदडा यांना संधी मिळाली आहे. जिल्ह्यातील आष्टी, गेवराई मतदार संघात अद्याप उमेदवार जाहिर केलेला नाही. भाजपने पहिली यादी जाहिर करत आघाडी घेतली आहे. महायुती मध्ये भाजप जवळपास 150जागा लढवणार आहे, ज्यातील 99 उमेदवार आज पहिल्या…
-
माझं राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव -धनंजय मुंडे!
पुणे -मी ज्याच्यासोबत आहे त्याच्यासोबत इमानदारी दाखवली म्हणून माझं राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव आखला जातं आहे, पण माझ्या नशिबात संघर्ष पाचवीला पुजला आहे, त्यामुळे तुमच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने मी कोणाला घाबरत नाही, तुम्ही साथ द्या, मी तुमच्यासोबत कायम राहील असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. पुणे येथे आयोजित विद्यार्थी संवाद मेळाव्यात मुंडे बोलत होते….
-
खाजगी शाळांची कसलीच माहिती शिक्षण विभागाकडे नाही!
मला पहा अन पैसे वहा, फुलारीचा नवा धंदा! बीड – बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग म्हणजे पैसे द्या आणि काहीही करा असाच झाला आहे शिक्षणाधिकारी असलेले फुलारी अक्षम्य असे दुर्लक्ष असल्याने बट्ट्याबोळ झाला आहे शाळांच्या संच मान्यता कुठलीच कागदपत्रे शिक्षण विभागात उपलब्ध नसल्यामुळे सुरू आहे नूतन सीईओ शिक्षण विभागाच्या या गैरप्रकाराला आणि फुलारींवर कारवाई करणार…
-
बीडकरांना दसरा दिवाळीचे गिफ्ट!
पालकमंत्री मुंडेनी दिली 28 हजार घरकुलांना मंजुरी! मुंबई -बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना ऐन सणासुदीच्या काळात मोठे गिफ्ट दिले असून, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून जिल्ह्यासाठी तब्बल 28 हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. याबाबतचे शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये एका शासन निर्णयाद्वारे…
-
डिसेंबर अखेर बायपासवर उड्डाणपुल करण्याचे न्यायालयाचे निर्देश!
बीड – बीड बायपासवर दिवसेंदिवस होत असलेले अपघात आणि जाणारे जीव यांची दखल आता मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली असून यासंदर्भातील आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला असून, डिसेंबर २०२४ पर्यंत १२ कि.मी. अंतर असलेल्या बीड शहराच्या लगत असलेल्या बायपासवर छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक येथे…
-
बीडच्या सिव्हिलची सूत्र पुन्हा डॉ थोरात यांच्याकडे!बडे ठरले राजकारणाचा बळी!!
बीड -लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असणारे आणि माजलगाव विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणारे डॉ अशोक थोरात यांची अचानक बीडच्या जिल्या शल्य चिकिस्तक पदावर नियुक्ती झाली आहे. डॉ अशोक बडे हे राजकारणाचा बळी ठरल्याची चर्चा यामुळे होतं आहे. बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात वादग्रस्त ठरलेले आणि विभागीय चौकशी सुरु असणारे डॉ थोरात यांची…