Category: देश-विदेश
-
देशभरात साजरा होणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिन !
नवी दिल्ली- केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.हैदराबाद स्वतंत्र्य लढ्यातील शहीदांचे बलीदान लक्षात राहवे यासाठी हा दिवस देशभरात साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.मराठवाड्यासाठी हा गौरवपूर्ण निर्णय असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. तो…
-
देशात सीएए लागू !
नवी दिल्ली- केंद्र सरकारने सीएए कायद्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधील शरणार्थी नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. सीएए कायदा लागू झाल्यानंतर आता जे शरणार्थी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात दाखल झाले आहेत. त्यांना भारताचं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामध्ये मुस्लिमांशिवाय हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी या धर्माच्या लोकांचा समावेश…
-
मोदी,अमित शहा यांच्यासह 195 उमेदवार जाहीर !
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 195 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह 34 मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातून एकाही नावाची घोषणा झालेली नाही. भाजपने पहिल्या टप्प्यात 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशाच्या 34 मंत्री आणि राज्यमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आले…
-
जरांगे ठाकरे पवारांची भाषा बोलू लागले-मुख्यमंत्री !
मुंबई- कायदा हातात घेण्याचा आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल शिवराळ भाषा कोणी वापरत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही,असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.मनोज जरांगे हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भाषा बोलत आहेत असा आरोप देखील शिंदे यांनी केला. सगेसोयरे मुद्यावरून सोळा दिवसापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आयोजित…
-
जरांगेचे फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप!थेट मुंबईकडे कूच !!
अंतरवली सराटी- गेल्या पंधरा दिवसापेक्षा जास्त काळापासून सगेसोयरे अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील हे रविवारी चांगलेच संतापले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत ते थेट मुंबईकडे निघाले आहेत.त्यांना समजावून सांगण्यासाठी मराठा बांधव सोबत आहेत. सराटी येथे बोलताना मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला.ते म्हणाले की,मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्णय झाला आहे….
-
मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण !
मुंबई- मराठा समाजाला स्वतंत्र रित्या दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय विधानसभेने एकमताने मंजूर केला.मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशनात हा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला जो सभागृहाने एकमताने मंजूर केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या विषयावर बोलताना म्हणाले की,मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, मी शब्द पाळतो. त्यामुळे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. मी मागचा विषय…
-
राष्ट्रवादी चे सर्व आमदार पात्र !
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व आमदार पात्र असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.हा निकाल देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिल्याचा उल्लेख करत अध्यक्षांनी हा निकाल दिला. विधिमंडळात असलेले बहुमत याच्या आधारे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नार्वेकर देखील याचा आधार…
-
अशोक चव्हाण,मेधा कुलकर्णी, अजित गोपच्छडे यांना भाजपची उमेदवारी !
मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तिघांना उमेदवारी जाहीर केली आहे.काँग्रेस मधून भाजपवासी झालेले अशोक चव्हाण, माजी आ मेधा कुलकर्णी आणि नांदेड चे अजित गोपच्छडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी देशभरातील 56 राज्यसभा उमेदवारासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र मधून 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यातील सत्ताधारी…
-
अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश !
मुंबई-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण आणि माजी आ अमरनाथ राजूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपमध्ये घाऊक प्रवेश सुरू झाले आहेत.काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अनेकवेळा येत होत्या.अखेर त्यावर शिक्कामोर्तब…
-
अशोक चव्हाण,चंद्रकांत हंडोरे,नसीम खान भाजप वासी !
मुंबई- गेल्या अनेक महिन्यापासून ज्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आपल्या समर्थक अकरा आमदारांसह आज सायंकाळी भाजप प्रवेश करणार आहेत.माजीमंत्री नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे हे देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अशोक चव्हाणांसह चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान हे देखील भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते…