News & View

ताज्या घडामोडी

Category: क्राईम

  • पाच लाखाची लाच स्वीकारली !पोलीस निरीक्षकासह तिघांवर गुन्हा !

    पाच लाखाची लाच स्वीकारली !पोलीस निरीक्षकासह तिघांवर गुन्हा !

    बीड- शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तब्बल 30 लाख रुपयांची लाच  मागून पाच लाख रुपये स्वीकारताना बीडमध्ये एका खाजगी इसमास अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खाडे याच्या बीड येथील घराची झडती घेतली असतां कोट्यवधी रुपये सापडल्याची माहिती…

  • बीड पोलिसांच्या डोळ्यावर पैशाची पट्टी !

    बीड पोलिसांच्या डोळ्यावर पैशाची पट्टी !

    307 मधील आरोपी पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रचारात ! बीड-जिल्हा पोलीस दलाला पैसे खाण्याचा रोग लागला की  राजकीय दबावाखाली काम करण्याची नवी पद्धत बीडच्या एसपींनी अंगवळणी पाडून घेतली आहे  अशी शंका येऊ लागली आहे .शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले सत्ताधारी पक्षाचे कुंडलिक खांडे यांच्यावर 307 सारखा गंभीर गुन्हा असताना देखील ते उजळ माथ्याने लोकसभेच्या प्रचारात हिंडत आहेत आजी-माजी…

  • बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाला बेड्या !

    बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाला बेड्या !

    बीड- शहरातील सम्राट चौक भागात राहणाऱ्या आणि धुळे येथे स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीस असलेल्या पोलीस निरीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.शिंदे यांच्या घराची झडती घेतली असता करोडो रुपयांची मालमत्ता आढळून आली. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 35 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आहेत. राजकीय सहकार्‍यांशी मतभेद झाल्याने त्यांच्याविरोधात…

  • शहर पोलिसांची मोठी कारवाई !

    शहर पोलिसांची मोठी कारवाई !

    बीड- कपड्याच्या दुकानात जायचे,दोन चार ड्रेस चोरायचे असा प्रकार करत करत तब्बल चार लाख रुपयांचे कपडे चोरणाऱ्या चोरट्याला बीड शहर पोलिसांनी अटक केले.पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने या चोराच्या मुसक्या आवळल्या. जानेवारी महिन्यात सुभाष रोडवरील आर के मेन्स वेअर या कपड्याच्या दुकानातून चार लाख रुपये किमतीचे रेडीमेड कपडे चोरी गेल्याची माहिती मिळाली…

  • लाचखोर तलाठी जेरबंद !

    लाचखोर तलाठी जेरबंद !

    बीड- सातबारावर मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना दिलीप कण्हेरकर या तलाठ्यास आणि त्याच्या सहकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील तलाठी दिलीप कण्हेरकर आणि त्याचा सहकारी दिगंबर गात या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे सातबारावर मालकी हक्कात नोंद करण्यासाठी सतरा हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत बीडच्या लाच लुचपत…

  • टाईपच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार !

    टाईपच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार !

    बीड- टाईप च्या परीक्षेत बीड जिल्ह्यात मोठा गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. तब्बल 85 विद्यार्थ्यांनी घरी बसून परीक्षा दिल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी केवळ एका शिक्षकावर गुन्हा दाखल करून प्रकरण मॅनेज करण्याचा उद्योग सुरू आहे.वास्तविक पाहता परीक्षा केंद्र,केंद्रप्रमुख आणि परीक्षा विभाग यांची चौकशी झाल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या टाईप च्या…

  • लिपिकाने मागितली साहेबांना लाच !

    लिपिकाने मागितली साहेबांना लाच !

    बीड- कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या आपल्याच साहेबांचे पगार बिल काढण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. छत्रपती संभाजी नगर येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या कार्यालयात नोकरीस असलेले कार्यकारी अभियंता यांच्याकडे जून ते ऑक्टोबर 2023 या पाच महिन्याचे पगार बिल काढण्यासाठी प्रत्येक महिन्याचे दोन हजार याप्रमाणे दहा हजार…

  • नाली साफ करताना जेसीबीच्या खोऱ्यात बाहेर आला मृतदेह !

    नाली साफ करताना जेसीबीच्या खोऱ्यात बाहेर आला मृतदेह !

    बीड- शहरातील सुभाष रोड,माळीवेस भागात नाल्यांची साफसफाई सुरू असताना जेसीबीच्या खोऱ्यात चक्क मानवी मृतदेह आल्याने खळबळ उडाली.पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे. बीड नगर पालिकेच्या माध्यमातून शहरातील नाल्यांची स्वच्छता मोहीम सध्या सुरू आहे.बीड शहरातील सुभाष रोडवर असलेल्या नेहरू नगर च्या मोठ्या नाल्याची जेसीबी मार्फत साफसफाई सुरू होती. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या खोऱ्यात…

  • विशाल साडी सेंटर फोडले !

    विशाल साडी सेंटर फोडले !

    बीड- शहरातील डीपी रोडवर असलेले विशाल साडी सेंटर या दुकानाचे शटर तोडून चोरट्यानी जवळपास साडेचार लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. बीड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सारडा नगरी समोर असलेल्या चंद्रप्रकाश सेठी यांच्या विशाल साडी सेंटर मध्ये बुधवारी चोरी झाली.दुकानाचे समोरचे शटर तोडून चोरट्यानी गल्यात असलेल्या साडेचार…

  • लाचखोर उपजिल्हाधिकारी ताब्यात !

    लाचखोर उपजिल्हाधिकारी ताब्यात !

    बीड- तलावात गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागून पाच हजार रुपये घेताना बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.निवृत्त मंडळ अधिकारी सरवदे यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सलग दुसऱ्या दिवशी महसूल विभागाच्या लाचखोरांवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथील तलावाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या घराचा पाच लाख…