Category: आर्थिक
-
सुरेश कुटे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का ? एसपी ठाकूर यांची भूमिका संशयास्पद !!
बीड- 90 हजार ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये आपल्याच कंपन्यांना कर्ज स्वरूपात घेऊन जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या सुरेश कुठे यांना पोलीस संरक्षण कोणाच्या आदेशावरून दिले गेले अनेक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज असताना गुन्हे का दाखल केले गेले नाहीत कुठे हे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली असून पोलीस अधीक्षक…
-
गुन्हे दाखल होताच ठेवीदारांना कुटेनी दिले पैसे !
बीड- येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्था ठेवीदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने वैतागलेल्या ठेवीदारांनी माजलगाव पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले.हे गुन्हे दाखल होताच कुटे यांनी आठ ठेवीदारांना 14 लाख रुपये परत केले.या प्रकरणी पोलिसांची भूमिका मात्र संशयास्पद असल्याची चर्चा आहे. ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्था ऑक्टोबर 2023 मध्ये बंद झाली.तेव्हापासून हजारो ठेवीदारांनी आपल्या ठेवी मिळाव्यात यासाठी…
-
लाचखोर खाडे पोलिसांना शरण !
बीड- तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये मध्यस्थांमार्फत स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले अन फरार असलेले लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे हा स्वतःहून एसीबी समोर हजर झाला आहे.पोलिसांनी त्याला अटक केली आहे. माँ जिजाऊ पतसंस्था प्रकरणात सहकार्य करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती….
-
खाडे च्या घरात कोट्यवधींचे घबाड !सोने ,चांदी जप्त !
बीड- तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक हरिभाऊ राठोयाच्या घरी एक कोटी रुपये रोख रकमेसह साडेपाच किलो चांदी आणि जवळपास साडेआठ तोळे सोने सापडले.यातील पो कॉ जाधवर यांच्या घरी 25 तोळे सोने आणि रोख रक्कम आढळून आली. शहरातील माँ जिजाऊ पतसंस्थेचे कंत्राटदार यांना आरोपी न करण्यासाठी…
-
हरिभाऊ खाडे फरार !घर केले सील !
बीड- एक कोटी रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये मध्यस्थांमार्फत स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांचे बीड येथील घर एसीबी ने सील केले आहे.खाडे यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. बीड येथील माँ जिजाऊ पतसंस्थेचे प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच आर्थिक गुन्हा…
-
पाच लाखाची लाच स्वीकारली !पोलीस निरीक्षकासह तिघांवर गुन्हा !
बीड- शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तब्बल 30 लाख रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये स्वीकारताना बीडमध्ये एका खाजगी इसमास अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खाडे याच्या बीड येथील घराची झडती घेतली असतां कोट्यवधी रुपये सापडल्याची माहिती…
-
का लावले माहीत नाही पण बँकेवरील निर्बंध हटवले- आदित्य सारडा !
बीड- गेल्या 65 वर्षांपासून आर्थिक क्षेत्रात नावाजलेल्या द्वारकादास मंत्री बँकेवर आरबीआय ने निर्बंध का लावले माहीत नाही,पूर्वीच्या संचालक मंडळावर 229 कोटींच्या अपहाराचा गुन्हा का दाखल केला माहीत नाही,प्रशासकाची नियुक्ती का झाली माहीत नाही,बँकेवर राजकारणातून कारवाई झाली का,बँक राजकारणाची बळी ठरली का?माहीत नाही मात्र आरबीआय ने आता बँकेवरील निर्बंध उठवले आहेत अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आदित्य…
-
आदर्श महिला नागरी बँकेचे लायसन रद्द !
नवी दिल्ली- छत्रपती संभाजी नगर अर्थात औरंगाबाद येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचे लायसन आरबीआय ने रद्द केले आहे.बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून ठेवीदारांना पाच लाखापर्यंत ठेवी परत मिळणार आहेत.या बँकेत 200 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला होता. जास्त व्याजाचे आमिष दाखवून छत्रपती संभाजी नगर येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेने गेल्या काही वर्षात…
-
राजस्थानी मल्टिस्टेट बंद ! ठेवीदारांची गर्दी !!
बीड- कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आणि मार्केटमध्ये एक वेगळी ओळख असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट च्या शाखा गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक बंद झाल्याने ठेवीदारांनी शाखा समोर एकच गर्दी केली आहे मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणे यांच्या समर्थनार्थ एकीकडे परळीत त्यांचे फॉलोवर्स रस्त्यावर उतरून त्यांना सपोर्ट करत असताना दुसरीकडे शाखा बंद झाल्याने ठेवीदार अडचणीत आले आहेत बीड जिल्ह्यात…
-
मल्टिस्टेट च्या कुटाण्यांमुळे प्लॉटिंग ला अच्छे दिन !
बीड- लोकांनी मोठ्या विश्वासाने ठेवलेले पैसे आपले खाजगी उद्योग प्लॉटिंग जमिनी घेण्यासाठी तसेच कारखाने आणि उद्योगधंदे उभारण्यासाठी वापरायचे आणि मनी लॉन्ड्रींग करत संस्था बुडाल्या की फरार व्हायचे असा सगळा उद्योग बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या मल्टीस्टेट आणि पतसंस्था चालकांनी केला यामुळे हजारो कोटी रुपये ठेविधानांचे बुडाले मात्र आता ज्या पतसंस्था आणि मल्टीस्टेट सुरू आहेत त्यांच्यासमोरही ठेवी काढण्यासाठी…