सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल द्वितीया/ भाऊबीज / यमद्वितीया
🌸 नक्षत्र…. अनुराधा
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. ११ नोव्हेंबर २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी. १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/३० मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️
‼️दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ ‼️
मेष:- चांगला दिवस आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नातेवाईकच्या भेटीगाठी होतील नियोजित कार्यात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे.
वृषभ:- चिंतीत कामामध्ये चिंतनातून मार्ग मिळेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. आध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होईल. प्रवास कार्यसाधक होतील.. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नात्यातील दुरावा कमी होईल.
मिथुन:- अनुकूल दिवस आहे. नियोजित व्यवहारात अनुकूलता राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. सणाचा आनंद मिळेल. कौटुंबिक जीवनात मतभेद टाळण्यात यश मिळेल.
कर्क:- पाहुण्यांच्या आगमनाने आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. भेटीतून नवीन करार होण्याची शक्यता आहे. अनुकूल दिवस आहे. महत्त्वाची कामे यशस्वी होतील. मनाला समाधान मिळेल.
सिंह:- नियोजित कार्यातप्रगती साधेल. कामाचा व्याप वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळावा.
कन्या:- मन प्रसन्न राहील. आनंदाची बातमी मिळू शकते. बौद्धिक आणि कलात्मक क्षेत्रात चांगले यश मिळेल. कौशल्याने प्रगती साधेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील.
तूळ:- आनंदी दिवस आहे. नातेवाईकांकडून चांगली माहिती मिळेल घरगुती वातावरण आनंदी राहील. नियोजित कार्यातप्रगती व सकारात्मक निर्णय होऊ शकतात. नोकरी – व्यवसायात अनुकूलता राहील.
वृश्चिक:- मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. कामात स्थिरता येईल संयम राहिल्याने नविन संधी लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. महत्त्वाच्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल.
धनु:- अनुकूल दिवस आहे. विचारपूर्वक महत्त्वाचे निर्णय घ्याल. परिवारिक जीवनात आनंदी राहाल. वाणीतील प्रभावामुळे कामे सोपी होतील. मित्र सहकारी मदत करतील. सकारात्मक विचार करा.
मकर:- प्रसन्नता लाभेल त्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होईल. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. आनंदी राहाल.
कुंभ:- शुभ शकुन मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी – व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रतिष्ठा सन्मान मिळेल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी अनुकूल दिवस आहे.
मीन:- खूप विचार करू नका आनंदाने कामाला लागा. भाग्याची उत्तम साथ मिळेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. दूरच्या प्रवासाचे योग येतील. कामात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक विकास होईल.





Leave a Reply