बीड – डॉक्टरकीचे शिक्षण घेताना अपयश आल्याने वेडसर वागणाऱ्या एका मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी खलबत्ता मारून गंभीर जखमी केले.उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या वृद्ध पित्याचा मृत्यू झाला.खळबळ उडवून देणारी ही घटना 18 जुलै रोजी शहरातील अंकुश नगरमध्ये घडली. दरम्यान आईच्या फिर्यादीवरून मुलावर खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सुरू होती.
पोलि
बीड शहरातील अंकुशनगर भागात राहणाऱ्या कुलकर्णी परिवारातील मुलगा सुधीर सुरेश कुलकर्णी हा २०१० मध्ये बीएएमएसमध्ये पास झाला होता. तो गेल्या तीन वर्षापासून एमडीचे शिक्षण घेत होता, परंतु यात त्याला अपयश आल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. असे असतानाच 18 जुलै रोजी घरात त्याच्या आई-वडिलांनी देवाची आरती केली होती. आरतीचे ताट घेऊन वडील सुरेश हे मुलगा सुधीरकडे गेले असता,मला कशाची आरती देतो म्हणत सुरुवातीला त्याने वडिलांसोबत वाद घालत त्यांना चापट मारली, नंतर डोक्यात खलबत्ता मारून रक्तबंबाळ करत पलायन केले.आईने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील लोक धावून आले. त्यांनी जखमी सुरेश काशिनाथ कुलकर्णी (70) यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी सुरेखा कलकर्णी (वय 62) यांच्या फिर्यादीवरुन मुलगा सुधीर कुलकर्णी (वय 38) याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.
Leave a Reply