News & View

ताज्या घडामोडी

images 2026 09 30T190642.070

आमदाराच्या मालकीच्या वसतिगृहातुन तीन विद्यार्थी बेपत्ता!

माजलगाव -राष्ट्रवादी काँग्रेस चे माजलगावचे आ प्रकाश सोळंके यांच्या सिंदफणा पब्लिक स्कुल च्या वसतिगृहात शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी रात्रीतून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.

माजलगाव शहराजवळ असलेल्या फुले पिंपळगाव  येथील सिंदफणा पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातून दहावीच्या वर्गात शिकणारे तीन विद्यार्थी रात्रीच्या जेवणानंतर बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्रीच्या हजेरीवेळी तिघेही विद्यार्थी आपल्या खोलीत आढळून न आल्याने वसतिगृह व्यवस्थापन आणि पालकांची चिंता वाढली. या तिघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांसह शाळा व्यवस्थापनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

बेपत्ता विद्यार्थ्यांची नावे तेजस चव्हाण, दिनेश चव्हाण आणि अभिजीत राठोड अशी आहेत. तिघेही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. यापैकी विद्यार्थी पाथरी (जि. परभणी), नित्रुड (ता. माजलगाव, जि. बीड) आणि आष्टी (जि. बीड) परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून वसतिगृह व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात असून, सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

दहावीच्या वर्गातील तीन विद्यार्थी एकाच वेळी बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात असून, तिघांचा लवकरात लवकर शोध लागण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *