बीड – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री तसेच बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कारभारावर थेटपणे नाराजी व्यक्त करत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दादा आणि वहिनीच्या कारभारात जमीन आसमान चा फरक आहे वहिनी आणि पी एस च्या सांगण्यावरून बीडमध्ये कारभार हाकत आहेत त्यामुळे विकासाची कामे जाणीवपूर्वक रोखून धरले जात आहेत असा आरोप करत आपली नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी ध्वजारोहणानंतर बीडमध्ये पत्रकार परिषदेत अनेक गंभीर विषय स्पष्टपणे मांडले. अजितदादा यांच्या निधनानंतर बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतलेल्या सुनेत्रा वहिनी यांचे पीए जरे आणि पीएस देशमुख हेच बीडचा कारभार हातात केवळ गुत्तेदार पोहोचण्याचे काम या लोकांकडून सुरू आहे त्यामुळे विकासाची कामे ठप्प आहेत.
बीडच्या पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन दिले गेले असते तर एक किंवा दोन दिवसाआड बीडकरांना पाणी मिळाले असते मात्र येथे देखील राजकारण आले आणि हा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला गेला असा आरोप आमदार क्षीरसागर यांनी केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली होती त्यामुळेच आपण सांगितलेली कामे मार्गी लागत होती मात्र सुनेत्रा वहिनींच्या काळात कारभार पीए आणि पीएस च्या हातात गेल्यामुळे आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींची कामे जाणीवपूर्वक रखडवली जात आहेत.
सुनेत्रा वहिनी या पूर्वी दोन वेळा बीडच्या दौऱ्यावर आल्या कंकालेश्वर येथील विकास कामांचे भूमिपूजन असेल किंवा संत भगवान बाबा मुलांच्या वस्तीग्रहाचा उद्घाटन कार्यक्रम असो तसेच ध्वजारोहणाचा कार्यक्रमाला देखील आपल्याला साधे निमंत्रण देखील दिले गेले नाही साडेतीन लाख लोकांचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतो आहे विरोधी पक्षात असलो तरीदेखील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी त्यांच्याकडे अनेक वेळा भेटीसाठी गेलो परंतु काही लोकांच्या सांगण्यावरून जाणीवपूर्वक बीड वासियांना विकासापासून वंचित ठेवले जात आहे असा आरोप आमदार क्षीरसागर यांनी केला.





Leave a Reply