News & View

ताज्या घडामोडी

images 49

विलास घुलेंच्या पत्नीने घेतले विष :प्रशासनात खळबळ!

बीड – चाळीस दिवसापूर्वी विलास घुले यांच्या झालेल्या निर्गुण हत्याप्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी शुक्रवारी सकाळी उपोषण स्थळीच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सुषमा घुले यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

केस तालुक्यातील हॉटेल व्यवसायिक विलास घुले हा भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर त्याचा निर्गुणपणे वार करून खून करण्यात आला होता याप्रकरणी आरोपींना तातडीने अटक करावी यासाठी तीन दिवस मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील करण्यात आले होते.

दरम्यान या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करावी अशी घुले कुटुंबाची मागणी होती या प्रकरणी पोलिसांनी एस आय टी देखील स्थापना केली होती. खासदार सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याने आरोपींना सहकार्य केल्याचे स्पष्ट असताना देखील पोलीस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे घुले यांच्या कुटुंबीयांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील दहा दिवसापासून उपोषण सुरू केले होते.

14 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मयत विलास घुले यांच्या पत्नी सुशमा घुले यांनी मीडियाशी बोलत असताना अचानक पणे स्वतःच्या हातातील विषारी औषधाची बाटली सर्वांसमोर पिली.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने श्रीमती घुले यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *