माजलगाव –माजलगाव येथील एका संस्थेचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाल्यानंतर एटीएसच्या पथकाने बुधवारी माजलगावात येऊन कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
उस्मानिया फाउंडेशन करिता गरीब लोकांच्या मदतीसाठी पैसे गोळा करून स्वतःच्याच खात्यात पैसेजमा जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून उस्मानीया फाउंडेशनच्या तीन जनाविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा आज बुधवारी दुपारी गुन्हा दाखल झाला आहे
तर आरोपी फरार असून एटीएस ने ही कारवाई केली आहे.
उस्मानिया फाउंडेशनच्या नावाखाली गरीब लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने मराठवाड्यामध्ये पैसे गोळा करण्यात येत होते परंतु सदरील रक्कम उस्मानिया फाउंडेशनच्या खात्यात जमा न करता वैयक्तिक स्वतःच्याच खात्यात जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी मोहम्मद मोहसिन मोहम्मद जमीर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात आली खिजर सय्यद, शेख हसीन शेख रशीद, हनिम नयूम शेख सर्व राहणार फुलेनगर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला असून सदरील कारवाई दहशतवादी विरोधी पथकाने केली आहे. दरम्यान या प्रकारामुळे शहरासह तालुक्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
माजलगावच्या संस्थेचे पाकिस्तान कनेक्शन!
दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या वादग्रस्त ‘दावत-ए-इस्लामी’ या संस्थेच्या संपर्कात असलेल्या आणि कुख्यात दहशतवादी शहजाद भट्टी गँगशी निगडित असलेल्या बार्शी येथील ‘अल हलिमी’ या बनावट ट्रस्टचे, माजलगाव (जि. बीड) येथील ‘गुलजार-ए-रजा’ या बनावट ट्रस्टसोबत थेट आर्थिक संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वीच माजलगावच्या या संस्थेवर गुन्हा नोंदवला गेला आहे. मात्र. आता ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.





Leave a Reply