बीड – मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत निवडणूक विभागाने नियुक्त केलेल्या मार्फत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती अपडेट करणे हा नियम असताना बीड जिल्ह्यात मात्र बहुतांश शहरी भागात आणि ग्रामीण भागात एकाच ठिकाणी बसून मतदारांची माहिती अपडेट करण्यासाठी त्यांना तिथे प्राचार्य केले जात असल्याची परिस्थिती आहे याकडे जिल्हाधिकारी आणि संबंधित निवडणूक उपजिल्हाधिकारी तसेच त्या त्या तालुक्याचे तहसीलदार कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात एस आय आर अर्थात मतदार पुनरावलोकन मोहीम सुरू केली आहे. महाराष्ट्रात देखील निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि यंत्रणेला ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
या सूचनानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांच्या शिक्षकांवर बीएलओ म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे या शिक्षकांनी आपल्या शाळेच्या वेळेनंतर प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदार यादीत दुरुस्ती करावयाचे असल्यास अथवा ती यादी अपडेट करावयाचे असल्यास माहिती भरणे अपेक्षित आहे.
घरोघरी जाऊन माहिती निवडणूक आयोगाने दिलेल्या फॉर्म मध्ये भरून घेणे अनिवार्य आहे मात्र बीड जिल्ह्यात बहुतांश शहरी भागात तसेच काही ग्रामीण भागात देखील मतदारांना एखाद्या शाळेत सांस्कृतिक सभागृहात अथवा इतर ठिकाणी एकत्रितपणे बोलवून फॉर्म भरून घेण्याचा उद्योग सुरू आहे.
बीड शहरातील बहुतांश प्रभागात त्या त्या शाळांमध्ये कॅम्प लावून माहिती अपडेट केली जात आहे हा प्रकार म्हणजे निवडणूक आयोगाचे निर्देश पायदळी तुडवण्याचाच प्रकार आहे वास्तविक पाहता सोमवार ते शुक्रवार घरोघरी जाऊन माहिती गोळा करायची त्या घरी संबंधित व्यक्ती उपलब्ध नसेल तर त्याला फोनवर संपर्क साधून शनिवार आणि रविवार त्या भागात कॅम्प आयोजित करून तेथे मतदारांची माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे परंतु संबंधित बीएलओ मात्र एकाच ठिकाणी बसून माहिती अपडेट करत असल्यामुळे या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बीएलओ यांना सहकार्य करण्यासाठी अनेक पक्षांनी आपले प्रतिनिधी नियुक्त केले आहेत त्यांच्यामार्फत मतदारांची घरे शोधणे मतदार बदलून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला असल्यास त्याचा पत्ता शोधणे आणि माहिती अपडेट करणे यासाठी प्रयत्न केले जात आहेत मात्र प्रत्येक वॉर्डामध्ये घरोघरी जाण्याऐवजी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना एकाच शाळेमध्ये बोलावून घेत तेथेच माहिती अपडेट केली जात आहे जे नियमबाह्य आहे.
याबाबत बीडचे निवडणूक उपजिल्हाधिकारी घोडे पाटील आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बीएलओ यांनी घरोघरी जाऊन माहिती अपडेट करणे अनिवार्य असल्याचे सांगितले. जेवण बी एल ओ अशा पद्धतीने माहिती एकाच ठिकाणी बसून अपडेट करत असतील त्यांची माहिती घेऊन कारवाई केली जाईल अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.





Leave a Reply