News & View

ताज्या घडामोडी

d550ed848a1c02dae69da7f870537aff1767921406844892 original

माजलगावच्या संस्थेचे पाकिस्तान कनेक्शन उघड!

माजलगाव -गुलजार ए रजा या ट्रस्टने माजलगाव येथील एका संस्थेच्या वेगवेगळ्या अकाउंट वर तब्बल 4 कोटी 73 लाख रुपये देणगी जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढी मोठी रक्कम जमा करणाऱ्या संस्थेचे पाकिस्तान मधील दावत ए इस्लामी या संस्थेशी संबंध असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता माजलगाव येथील संस्था देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

दहशतवाद विरोधी पथकाच्या  तपासात एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या वादग्रस्त ‘दावत-ए-इस्लामी’  या संस्थेच्या संपर्कात असलेल्या आणि कुख्यात दहशतवादी शहजाद भट्टी  गँगशी निगडित असलेल्या बार्शी  येथील ‘अल हलिमी’ या बनावट ट्रस्टचे, माजलगाव (जि. बीड) येथील ‘गुलजार-ए-रजा’  या बनावट ट्रस्टसोबत थेट आर्थिक संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वीच माजलगावच्या या संस्थेवर गुन्हा नोंदवला गेला आहे. मात्र. आता ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या  दहशतवाद विरोधी पथकाच्या बीड युनिटने माजलगावातील ‘गुलजार-ए-रजा’ या बनावट ट्रस्टचा भांडाफोड केला होता. या ट्रस्टने 5 वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे  तब्बल 4 कोटी 73 लाख रुपयांची देणगी  जमा केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना यापूर्वीच अटक केली असून ते सध्या कारागृहात आहेत. सध्या या संस्थेचे फॉरेन्सिक ऑडिट सुरु आहे
दरम्यान, असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी  येथेही समोर आला होता. तेथे ‘अल हलिमी’ नावाने बनावट ट्रस्ट स्थापन करून सुमारे 10 कोटी रुपयांची देणगी गोळा करण्यात आल्याचे उघड झाले होते. आता या दोन्ही बनावट ट्रस्टच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहारांची अत्यंत बारकाईने चौकशी केली जात आहे.

या दोन्ही संस्था आणखी कोणत्या धर्मादाय किंवा इतर संस्थांच्या संपर्कात होत्या का? तसेच या दोन्ही ट्रस्टच्या संपर्कात आलेल्या तरुणांची सद्यस्थिती काय आहे आणि ते नेमके कोणते व्यवसाय करत आहेत, या सर्व बाबींची सखोल पडताळणी एटीएसकडून केली जात आहे. या तपासातून येत्या काही दिवसांत आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यासाठी वेगाने तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *