सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 नीज ज्येष्ठ कृष्ण / भागवत एकादशी
🌸 नक्षत्र…. कृतिका
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. ११ जूलै २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक ११ जुलै २०२६‼️
मेष:- समाधानकारक घटनांचा दिवस आहे. आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. भेटीगाठीतून महत्त्वाची कामे सहज होतील. प्रतिष्ठा सन्मान मिळेल. मित्र कुटुंबासोबत आनंदी राहाल.
वृषभ:- व्ययातील चंद्र मनाची चंचलता व अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कामाचा ताण वाढेल जबाबदारीने कार्य संपादन कराल. अडचणीत एखाद्याला मदत कराल.
मिथुन:- नविन परिचय होतील त्यातून लाभ होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. पूर्व संकल्पित कामे मार्गी लागतील. आर्थिक कामामध्ये प्रगती साधेल. सुसंवादाने मतभेद कमी होतील.
कर्क:- चांगला दिवस आहे. नियोजनपूर्वक केलेल्या कामामध्ये यश मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कौशल्यपूर्ण कामामुळे प्रतिष्ठा वाढेल.
सिंह:- मना त्वा ची रे पूर्वसंचित केले. चांगल्या विचारातून केलेल्या कामामध्ये वरिष्ठांची साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक होईल.
कन्या:- मना सत्य संकल्प जीवी धरावा । व्यवहारात सावधगिरी बाळगा. दुसर्यांवर विश्वासून राहण्यापेक्षा लक्षपूर्वक विचारपूर्वक कार्य करा. संयमाने कामात चांगली प्रगती साधेल.
तुळ:- केल्याने होत आहे रे ! योग्य व्यक्तीच्या भागीदारी कामात यश मिळेल. कुटुंबातून सहकार्य लाभेल. कृतीशील विचारातून महत्त्वाच्या चर्चेत सकारात्मक निष्कर्ष मिळतील.
वृश्चिक:- जबाबदारी वाढेल मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नियमितपणा लाभदायक ठरेल. सुसंवादाने मनाला आनंद मिळेल. अनावश्यक विचारांपासून दूर राहा.
धनु:- आनंददायक घटना घडतील. उत्साह वाढेल आध्यात्मिक धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. मित्र सहकारी याकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आर्थिक नियोजन जमेल.
मकर:- समाधानकारक दिवस आहे. सुखवस्तु खरेदीचा योग आहे. घरगुती वातावरण चांगले राहील. स्थावर संबंधित कामात प्रगती होईल. मित्र कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल.
कुंभ:- मन करा रे प्रसन्न । सकारात्मक विचाराने कामामध्ये प्रगती साधाल. संवादकौशल्यामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन संपर्कातून काही लाभ होऊ शकतात.
मीन:- चांगला दिवस आहे. धन स्थानातील चंद्र बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नविन विचार आमलात आणण्यासाठी अनुकूल काळ आहे. कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ घालवाल.





Leave a Reply