News & View

ताज्या घडामोडी

Screenshot 20260708 145042 Facebook

नाली बांधकाम कोसळले :बोगस कामाची पोलखोल!

बीड – नगर परिषदेच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या रस्ता आणि नालीच्या कामात गुत्तेदारकडून बोगसपणा केला जातं असल्याचे उघड झाले आहे. राजुरीवेस ते कबाडगल्ली या रस्ता कामासाठी चार दिवसापूर्वी बांधलेली नाली कोसळली आहे. त्यामुळे हे काम किती निकृष्ट दर्जाचे होतं आहे हे उघड झाले आहे. शहरात सुरु असलेली सर्वच कमर बोगस असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सनी वाघमारे यांनी केला आहे.

बीड शहरांत जवळपास तीस रस्त्यांच्या कामासाठी 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानंतर या कामांची वर्क ऑर्डर एकाच एजन्सीला देण्यात आली. वास्तविक पाहता ही कामे एकाच एजन्सी ला कशी दिली, त्यांच्याकडे तेवढी यंत्रणा आणि मनुष्यबळ आहे कि नाही याचा विचार प्रशासनाने आणि सत्ताधारी यांनी केला कि नाही हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

अशातच यातील काही कामे उशिरा का होईना सुरु करण्यात आली. पावसाळा सुरु झाल्यानंतर ही कामे सुरु झाली. परंतु यातील राजुरीवेस ते कबाडगल्ली या रस्त्याचे काम चार दिवसापूर्वी सुरु करण्यात आले.

मात्र मंगळवारी या रस्त्यासाठी तयार केलेल्या नाल्याच्या कामातील काही भाग कोसळला. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील जवळपास वीस रस्त्याची कामे अद्याप सुरु झालेली नाहीत, अशातच सुरु असलेल्या कामाचा काही भाग कोसळला असल्याने गुत्तेदाराच्या कामाच्या गुणवत्तेबाबत चर्चा सुरु झाली आहे.

बीड शहरांत एकाच एजन्सीला सगळी कामे का दिली गेली, इतर एजन्सी यासाठी पात्र नव्हत्या का, या एजन्सीकडे तेवढे पुरेसे मनुष्यबल आणि यंत्रणा आहे का, वर्क ऑर्डर होऊन अनेक महिने झाले तरी पन्नास टक्के रस्त्याची विकास कामे का सुरु झाली नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते सनी विष्णू वाघमारे यांनी जिल्हाधिकारी आणि नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.

बोगस काम करून शासनाच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करून ती एजन्सी ब्लॅकलिस्ट करावी अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *