News & View

ताज्या घडामोडी

5 25 650x399 1

वाळू घोटाळ्यातील आरोपीना पोलिसांचे अभय!

बीड – घरकुलाच्या नावाखाली बोगस ईटीपी पावत्या तयार करून शासनाला जवळपास 100 कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल पोलीस कॉन्स्टेबल यांच्यासहित ज्या 19 लोकांवर चकलंबा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे त्या सगळ्या आरोपींना सपोनी इंगळे यांनी अभय दिले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे गुन्हा दाखल होऊन आठ दिवस झाले तरी देखील पोलिसांना आरोपी सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे

गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन येथून ऑगस्ट 2025 ते जून 2026 या दहा महिन्यांच्या काळात तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे , तलाठी गोविंद ढाकणे व त्यांच्या टीमने घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्याच्या नावाखाली 25 हजार पेक्षा अधिक ब्रास वाळूची चोरी केली ही वाळू बीड धाराशिव संभाजीनगर जालना या भागात विक्री करण्यात आली

याबाबत न्यूज अँड न्यूज ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन चौकशीची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी तहसीलदार खोमणे यांच्यासहित 38 जणांचे लेखी जबाब घेतले मात्र त्यातील केवळ 19 जणांवरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्यातही तहसीलदार खोमणे यांच्यावर कुठलाच गुन्हा दाखल झाला नाही तेव्हापासूनच या सगळ्या प्रक्रिये बाबत शंका व्यक्त केली जात होती

दरम्यान या प्रकरणात गुन्हे दाखल झालेले तलाठी गोविंद ढाकणे यांच्यासहित जे तलाठी ग्रामसेवक कोतवाल पोलीस कर्मचारी आणि सरपंचांसहित सामाजिक कार्यकर्ते आहेत ते बहुदा गेल्या आठ दिवसापासून पोलिसांना सापडत नसावेत एरवी एखादा पाकीटमार शोधायचा म्हणलं तर पोलीस अवघ्या काही तासात त्याला जेरबंद करतात मात्र चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनी इंगळे हे स्वतः तहसीलदार खोमणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या वाळू चोरी प्रकरणात दोषी आहेत अशी चर्चा आहे त्यामुळेच गुन्हा दाखल होऊ नये त्यांनी या आरोपींना अद्याप पर्यंत अटक केलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *