बीड – राक्षस भवन येथून 25 हजार ब्रास पेक्षा अधिक वाळू बेकायदेशीरपणे उपसा करून शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्यासहित 15 गावचे मंडळ अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तहसीलदार खोमणे अँड कंपनीने घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली उपसलेली वाळू ही पूर्णपणे बेकायदेशीर आणि शासनाचे नियम धाब्यावर बसवून करण्यात आली आहे असा ठपका जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेल्या अहवालात ठेवण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकारी कर्मचारी आणि एजंट यांच्यावर गुन्हे दाखल होणार हे नक्की झाले आहे.
गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे राक्षसभुवन चे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे यांनी आसपासच्या गावातील तलाठी मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या मदतीने तब्बल 25 हजार ब्रास पेक्षा अधिकची वाळू राक्षस भुवन येथून उपसा केली शासनाच्या डोळ्यात धुळपेकरत तहसीलदारांनी स्वतःच या वाळू चोरीला प्रोत्साहन दिले आणि पोलीस बंदोबस्तात ही वाळू चोरी करण्यात आली अशा तक्रारी आमदार विजयसिंह पंडित आणि ग्रामस्थांनी केल्या.
या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दहा पथके नियुक्त करून ज्यांना ज्यांना घरकुल वाटप झाले आहेत त्या सगळ्यांची घरी जाऊन तपासणी केली धक्कादायक बाब म्हणजे गेवराई तालुक्यात जी घरकुले मंजूर झाले आहेत त्यातील 75 टक्के लाभार्थ्यांना वाळूच मिळालेली नाही मग त्यांच्या नावावर उपसा केलेली वाळू गेली कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.


या गंभीर प्रकरणाची माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार खोमणे यांच्यासहित धुमेगाव, इरगाव, गंगावाडी तहत तलवाडा, बेलगाव, बगपिंपळगाव, इटकूर, एरंडगाव, जातेगांव, बेलगुडवाडी, उमापूर, गढी,किनगाव,म्हाळस पिंपळगाव, धोंडराई, राक्षसभुवन आणि भायाला येथील मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
12 जून रोजी या सगळ्यांना जिल्हाधिकारी यांच्या समक्ष हजर राहून खुलासा मांडण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी तहसीलदार खोमणे अँड कंपनी विरुद्ध कारवाईचा जो भडगाव उगारला आहे त्यासोबतच त्यांनी खोमणे यांच्या सांगण्यावरून ज्या ज्या वाहन चालकांनी आणि मालकांनी घरकुल च्या नावाखाली वाळू वाहतूक करून इतर ठिकाणी ही वाळू टाकलेली आहे त्याची देखील चौकशी करून सर्व वाहने जप्त करावीत आणि त्यांच्या मालक-चालकांवर गुन्हे दाखल करावेत तरच वाळू माफी यांच्या या गंभीर प्रकरणाला आळा बसेल.





Leave a Reply