बीड -सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील वाढीव मोबदल्याच्या १५४ प्रकरणात २४१ कोटी ६२ लाख रुपयांच्या घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी गुरुवारी अटक केली.पाठक यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात ७२ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला वाटप करुन अपहार झाला होता. या प्रकरणी बीडच्या शिवाजी पोलीस ठाण्यात पूर्वी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.आज बीड न्यायालयासमोर त्यांना उभे केले असता त्यांना 15 मे पर्यंत 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे समजते.
या प्रकरणातील कागदपत्रांमध्ये अविनाश पाठक यांच्या स्वाक्षरीबाबतचे अहवाल तपासल्यानंतर त्यांना चौकशीसाठी लातूरहून ताब्यात घेण्यात आले. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यास अटक होण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच वेळ असल्याने खळबळ उडाली आहे.





Leave a Reply