News & View

ताज्या घडामोडी

pudharinews 2026 03 24 mkmkynia Financial Fraud Devendra Fadnavis

देवेंद्र जी, छत्रपतींचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?

विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर

आजी आजोबांच्या कुशीत शिरून बडबडगीत किंवा छान छान गोष्टी ऐकण्याचं वय असलेल्या एका चिमुरडीवर एका 65 वर्षाच्या नराधमाने अत्याचार करावा आणि तिचा खून करून मृतदेह लपवून ठेवावा ही घटना काळजाला घरं पाडणारी आहे. ज्या वयात लेकरू बोबडे बोल बोलत हसत खेळत असतं त्या वयात त्याच्यावर पाशवी आत्याचार व्हावेत अन तव ही महाराष्ट्रसारख्या राज्यात या सारखे दुर्दैव नाही. राज्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे अन त्यांच्या कार्यकाळात या घटना व्हाव्यात हे लाजिरवाणे आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा वसा आणि वारसा आम्ही जपतो आहोत असं आपण नेहमी म्हणता मग अशा घटना घडतं असतील तर आरोपीचे शीर कलम करण्याची हिंमत दाखवा नाहीतर छत्रपतींचा वारसा सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? असा प्रश्न विचारावा लागेल.

एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र  1 मे चा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणाऱ्या नसरापूर येथे आपल्या आजोळी उन्हाळ्याच्या सुट्यासाठी गेलेल्या एका लहान बालिकेच्या नशिबी हा असा अत्याचार व्हावा म्हणजे माणसातील पशु जागा होण्याचेच लक्षण म्हणावे लागेल. अरे कोण तो भीमा कांबळे नावाचा थेरडा, ज्याने आपल्या नातीच्या वयाच्या बालिकेवर असा निर्घृण हल्ला केला. लाज कशी वाटली नाही त्याला.

वासरू दाखवतो म्हणत या हरामखोर माणसाने (माणूस कसला हा तर नरभक्षक म्हणावं लागेल )अनन्वित अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता या नालायक माणसाने तिची निर्घृण हत्या केली. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र देवेंद्र जी. तुमच्या राज्यात अन तुम्ही गृहमंत्री असताना जर भीमा कांबळे सारखा दोन वेळा अत्याचार करणारा हिंस्त्र श्वापदा सारखा मोकाट फिरणार असेल अन लहान लेकरांचे जीव घेणार असेल तर कायदा बाजूला ठेवून त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे.

अहो देवेंद्र जी, तुम्ही खूप कर्तव्य कठोर आहात असं बोललं जातं मग अशा घटना घडल्यावर पोलीस तपास अन इतर गोष्टीत का वेळ घालवता. तुमच्याच पक्षाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदर्श घ्या. अशी कु कृत्य करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवा अन भर चौकात त्याला फासावर लटकवा.

दाखवून द्या तुम्ही पण किती कठोर आहात ते. काय म्हणला असेल त्या लेकराचा जीव, काय कळतं होतं का हो तिला, कोण आपलं, कोण परकं. आपल्या आजोबाच्या वयाच्या माणसांवर त्या भाबड्या लेकरानं विश्वास ठेवला हा का तिचा दोष. चॉकलेट, आईस्क्रीम खाऊन दुडूदुडू धावण्याचं त्या लेकराचं वय अन तिच्या नशिबी हे असले भोग यावेत यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही.

ग्रामस्थांनी त्या आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस तपासात त्याने यापूर्वी सुद्धा दोनवेळा हेच प्रकार केल्याचे आणि तो तीन महिन्यात जेलच्या बाहेर आल्याचे समोर आले आहे. कायद्यातील या अशा पळवाटा त्या लहान लेकरांच्या जीवावर बेतल्या हो देवेंद्र जी.

देवेंद्र जी, तुम्ही सुद्धा एका मुलीचे बाप आहात, काय वाटतं असेल त्या लेकराच्या आई बापाला याचा तरी विचार करा. कायदा अन त्याचा धाक कमी झाल्याचे हे लक्षण आहे. खाकी वर्दी एवढी कधीपासून लाचार झाली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतं आहे.राज्यातील दहा बारा कोटी लोकांची अन विशेषतः लेकीच्या बापांची तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे.

एखाद्या खेडे गावात जर अशा घटना दिवसाढवळ्या घडतं असतील तर कायद्याचा धाक उरला आहे कि नाही असा प्रश्न निर्माण होतो. शहरात कुठे ना कुठे दररोज कोणत्या ना कोणत्या स्त्रीच्या, मुलीच्या, विद्यार्थिनीच्या अब्रूवर दरोडे घातले जातं आहेत. महाराष्ट्रातील क्राईम रेट कमालीचा वाढला आहे. खरात सारखे भोंदू बाबा असोत कि बीडच्या मिलिया शाळेतील आमेर काझी सारखा नराधम असो अथवा नाशिक मधील टिसीएस कंपनीतील कार्पोरेट जिहाद च प्रकरण असो,रोज महिलांवरील अत्याचार वाढत आहेत अन यामुळे महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली जातं आहे.

देवेंद्र जी, एखादी घटना घडली कि त्यावर निष्पक्ष चौकशीचे आदेश द्यायचे. कठोर कारवाई केली जाईल असं सांगायचं अन नंतर मात्र फाईल बासनात गुंडाळून ठेवायची. कुठवर चालणार हे सगळं. चीड येतं नाही का हो तुम्हाला. आया बहिणीच्या अब्रूवर दरोडे घातले जातं असताना शांत अन निवांत झोप तरी कशी येते तुम्हाला.

1 मे महाराष्ट्र दिन सगळीकडे उत्साहात साजरा होतं असताना त्याच दिवशी एका चिमुरडीवर अत्याचार व्हावेत ही महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी गोष्ट आहे. देवेंद्र जी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्या 105 हुतात्म्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली निदान त्यांची आठवण ठेवून तरी या भीमा कांबळे ला फाशी द्या. दाखवून द्या हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श सांगणारा आणि त्यांच्या पावलावर पाऊला ठेवून चालणारा आहे. दुष्मनाच्या स्त्री बद्दल अपशब्द बोलणाऱ्याचे हात कलम करण्याची शिक्षा ज्या छत्रपती शिवाजी राजेंनी दिली होती, त्यांचं नाव घेण्याचा आपल्याला अधिकार आहे असे वाटतं असेल तर या अन अशा घटनाना जबाबदार असणाऱ्यांचे शीर कलम करा. तरच हा महाराष्ट्र तुम्हाला कायम लक्षात ठेवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *