बीड –केज तालुक्यातील मस्साजोग चे सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या हत्येंनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक झाली. यामध्ये संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी विजय मिळवला.
जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, अत्यंत चुरशीच्या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव केला.
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत गावातील एकूण २ हजार ८४ मतदारांपैकी १ हजार ७४४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे तब्बल ८४ टक्के मतदान नोंदवले गेले होते.
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पद रिक्त झाले होते. त्यानंतर या पदासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली होती, तर त्यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख यांनी जोरदार आव्हान उभे केले होते.
आज सकाळी दहा वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. निकाल जाहीर होताच मस्साजोग ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट झाले.
स्वरूपानंद देशमुख यांचा मागील वेळी संतोष देशमुख यांनी अवघ्या 9 मतांनी पराभव केला होता. यावेळी त्यांनी 92 मतांनी विजय मिळवत आपल्या पाठीशी जनमत असल्याचे सिद्ध केले.





Leave a Reply