सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल षष्ठी / श्री रामानुज आचार्य जयंती
🌸 नक्षत्र…. आद्रा
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. २२ एप्रिल २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक २२ एप्रिल २०२६‼️
मेष :
आज सकाळपर्यंत चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढलेला राहील. दुपारनंतर आर्थिक आणि कौटुंबिक गोष्टींकडे लक्ष जाईल. चंद्र-शुक्र युतीमुळे स्त्रियांना सौंदर्य, खरेदी, कपडे, दागिने किंवा घर सजावटीत आनंद मिळेल. एखादी अचानक चांगली बातमी मिळू शकते. मात्र मंगळ-शनी युतीमुळे रागावर नियंत्रण ठेवा.
वृषभ :
आज सकाळ काहीशी संथ राहील मात्र
दुपारी 12:31 नंतर चंद्र तुमच्या राशीत येत असल्याने दिवसाचा दुसरा भाग तुमच्यासाठी खूप लाभदायक राहील. आकर्षण वाढेल, लोक तुमचे म्हणणे ऐकतील. नात्यात प्रेम आणि जिव्हाळा वाढेल. अचानक एखादा निर्णय घ्यावा लागेल, पण तो तुमच्या फायद्याचा ठरेल. आरोग्याकडे मात्र थोडे लक्ष द्या.
मिथुन :
आज महत्वाची कामे सकाळी च उरकून घ्या. आर्थिक दृष्टीने चांगला.
आज मनात अनेक विचार चालू राहतील. काही गोष्टी गुप्त ठेवणे तुमच्यासाठी चांगले राहील. चंद्र-शुक्र योगामुळे जुनी मैत्री किंवा जुना संपर्क पुन्हा जुळू शकतो. दुपारनंतर खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रवास, औषधे किंवा घरासाठी खर्च होईल. शांत राहिल्यास दिवस व्यवस्थित जाईल.
कर्क :
आज
मित्र मैत्रिणी, सहकारी किंवा नातेवाईकांकडून मदत मिळेल. एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. चंद्र-शुक्र युतीमुळे सामाजिक कार्यक्रम, पार्टी किंवा भेटीगाठींमध्ये आनंद मिळेल. कामाच्या ठिकाणी स्त्रियांसाठी नवीन संधी मिळू शकते. संध्याकाळनंतर चांगली बातमी मिळेल.
सिंह :
आज
करिअर आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे राहील. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. मंगळ-शनी युतीमुळे कामाचा ताण वाढेल, पण संयम ठेवल्यास मोठा फायदा होईल. नोकरी, व्यवसाय किंवा नवीन जबाबदारीची संधी निर्माण होईल.
कन्या :
आज प्रवास, शिक्षण, परीक्षा किंवा नवीन योजना यासाठी दिवस चांगला आहे. मन सकारात्मक राहील. चंद्र-शुक्र योगामुळे धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षण वाढेल. दुपारनंतर नशिबाची साथ मिळेल. एखादे अडलेले काम अचानक पूर्ण होऊ शकते.
तुळ :
आज आर्थिक व्यवहार जपून करा. कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. चंद्र-शुक्र योगामुळे जोडीदाराकडून किंवा कुटुंबाकडून भावनिक आधार मिळेल. अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे, पण खर्चही वाढू शकतो. आरोग्याच्या बाबतीत पोट किंवा थकवा जाणवू शकतो.
वृश्चिक :
आज
नातेसंबंधांसाठी दिवस महत्त्वाचा आहे. पती-पत्नीमध्ये संवाद वाढेल. अविवाहित पुरुष व महिलांना नवीन ओळख होऊ शकते. चंद्र-शुक्र युतीमुळे प्रेमसंबंधात गोडवा येईल. मात्र मंगळ-शनी युतीमुळे हट्टीपणा किंवा अहंकार टाळा. समोरच्याचे मत ऐकल्यास फायदा होईल
.
धनु :
आज कामाचा व्याप वाढेल. घर आणि बाहेर चे दोन्ही सांभाळताना थोडा थकवा येईल. तरीही चंद्र-शुक्र योगामुळे सहकाऱ्यांची मदत मिळेल. आरोग्य, सौंदर्य किंवा फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी दिवस चांगला आहे. दुपारनंतर छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळेल.
मकर :
आजचा दिवस आनंद, प्रेम आणि सर्जनशीलतेसाठी उत्तम आहे. मुलांकडून किंवा कुटुंबाकडून आनंद मिळेल. महिलांसाठी नवीन छंद, कला किंवा व्यवसायाची संधी मिळू शकते. प्रेमसंबंधात गोडवा राहील. अचानक भेट, गिफ्ट किंवा चांगली बातमी मिळू शकते.
कुंभ :-
आज
घर, कुटुंब आणि मालमत्तेशी संबंधित विषय महत्त्वाचे राहतील. घरात सजावट, बदल किंवा खरेदी होऊ शकते. चंद्र-शुक्र युतीमुळे घरातील वातावरण आनंदी राहील. आई किंवा वडिलांशी संबंध अधिक जवळचे होतील. मात्र मंगळ-शनी योगामुळे घरात किरकोळ वाद होऊ शकतो.
मीन :
आज संवाद आणि व्यवहारातून फायदा मिळेल. फोन, मेसेज किंवा भेटीतून एखादी चांगली बातमी मिळेल. चंद्र-शुक्र युतीमुळे बहिण, मैत्रीण किंवा जवळच्या व्यक्तीशी नाते अधिक मजबूत होईल. छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीतही दिवस अनुकूल राहील.





Leave a Reply