बीड – नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्यामुळे कबाड गल्ली भागातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार आणि माजी सभापती बाळासाहेब जाधव यांच्यासह पाच ते सात जणांनी भाजप नगरसेविका सौभाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर भ्याड हल्ला केला. विशेष म्हणजे हा सगळा हल्ला होत असताना घराच्या गॅलरीत उभे असलेले सागर देशपांडे यांचे वडील यांच्यावर आणि सागर देशपांडे वर बीड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून जावई शोध लावला आहे.
बीड शहरातील प्रभाग क्रमांक सात येथील भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार सौ भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांना निवडणुकीचा निकाल लागल्यापासून पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव हे जाता येता शिवीगाळ करणे मारहाण करण्याची धमकी देणे अंगावर गाडी घालणे असे प्रकार करत होते.
शुक्रवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास देशपांडे हे आपल्या घराच्या दारात बोलत उभे असताना अचानक जाधव त्यांच्या मुलाला आणि इतर पाच ते सहा जणांना घेऊन आले आणि त्यांनी सागर देशपांडे यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे ज्यात स्पष्टपणे दिसते आहे की देशपांडे हे फोनवर बोलत असताना जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समोरून येत पोटात डोक्यावर पाठीवर लाथा बुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करत देशपांडे यांना जखमी केले.
विशेष बाब म्हणजे सागर देशपांडे यांचे वडील अरुणराव देशपांडे हे हा सगळा प्रकार आणि हल्ला सुरू असताना आपल्या घराच्या गॅलरीत उभा राहून पहात असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे, तसेच सागर देशपांडे हे देखील आपल्या दारात उभे राहून फोनवर बोलत असल्याचे दिसत आहे.असे असताना देखील बीड शहर पोलिसांनी अरुण देशपांडे यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे एखादा व्यक्ती घटनास्थळी हजरच नाही तो आपल्या घरात आहे हे माहीत असतानाही पोलीस जर खोटे गुन्हे दाखल करणार असतील तर बीड शहर चे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांच्यावर पोलीस अधीक्षक कारवाई करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
याप्रकरणी सागर देशपांडे यांच्या फिर्यादीवरून पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव यांचा मुलगा आणि इतर पाच ते सहा जणांविरुद्ध बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कबाड गल्ली भागात राहणारे बाळासाहेब जाधव यांचा मूळ उद्योग मटका घेणे आणि पत्त्याचे क्लब चालवणे हा असल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे देखील दाखल आहेत आणि या प्रकरणात जाधव हे मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही पोलिसांनी त्यांची फिर्याद घेऊन देशपांडे पिता पुत्रावर गुन्हा दाखल करून एकप्रकारे आरोपीलाच सहकार्य केल्याची चर्चा आहे.





Leave a Reply