News & View

ताज्या घडामोडी

teacher 2

बोगस शालार्थ आयडी :एस आय टी ला मुदतवाढ!

बीड – नागपूर अमरावती जळगाव येथील शिक्षक भरती मधील शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने नेमण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकाला अर्थात एस आय टी ला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

नागपूर येथे 800 पेक्षा जास्त बोगस शिक्षकांची भरती झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणि या प्रकरणात 22 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी आणि संस्थाचालक यांना अटक झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. नागपूर सारखाच प्रकार जळगाव अमरावती नाशिक मराठवाडा विशेषतः बीड जिल्हा या भागात झाल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या.

बीड जिल्ह्यात बोगस शालार्थ आयडी मध्ये जे काही घोटाळे झाले आहेत वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाचे प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे अधीक्षक यांच्यासहित कर्मचारी देखील सहभागी असून या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी देखील या भरती प्रकरणातून लाखो रुपये छापले असल्याची चर्चा आहे त्यांच्यावर देखील चौकशी करून कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

याबाबत विधानसभेच्या अधिवेशनात देखील अनेक आमदारांनी थेट प्रश्न उपस्थित केले त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपासणी पथकाची नियुक्ती केली. 2012 ते 2024 या काळात भरती झालेल्या सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती ऑनलाईन आणि ऑफलाइन देण्याचे आदेश एसआयटीने सर्व संस्था चालक तसेच शिक्षण अधिकारी यांना दिले होते.

बोगस शिक्षक भरती प्रकरणांमध्ये बीडचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि नागनाथ शिंदे या दोघांवर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे मात्र तरी देखील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना जाग आलेली नाही नव्याने आलेले शिक्षणाधिकारी असो किंवा सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी हे मागील तारखे मध्ये ऑर्डर काढून संस्था चालकांचे भले करण्याचा उद्योग करू लागले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई होणे आवश्यक आहे.

विदर्भ प्रमाणे मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात काही दलाल कार्यवाह सहकार्यवाह आणि संस्थाचालक यांनी हजारो बोगस शिक्षक भरती करून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले त्यामुळे संपूर्ण राज्याच्या संस्थांची तपासणी करायची असल्यास कालावधी कमी पडत असल्यामुळे यासाठी ला जून 2026 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

यापूर्वी देखील दोन वेळा यासाठी ला मुदतवाढ दिली गेली आहे महाराष्ट्रातील चार हजारापेक्षा अधिक शिक्षक आणि कर्मचारी यांची माहिती अद्याप एसआयटी कडे प्राप्त झालेली नाही त्यामुळे आता जून 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने चौकशी पूर्ण होणार की पुन्हा एकदा मुदतवाड दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *