News & View

ताज्या घडामोडी

IMG 20260330 WA0007

चोरी जीवावर बेतली, दोघांचा मृत्यू!

केजविजेच्या तारीची चोरी दोघांच्या जीवावर बेतली आहे. टॉवर वर चढून तार चोरी करताना टॉवर कोसळले आणि यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बीडच्या केज तालुक्यात उभारण्यात आलेल्या हाय व्होल्टेज टॉवरवर चढून तार चोरीचा प्रयत्न करताना टॉवरच कोसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यामध्ये दोन चोरट्यांचा मृत्यू झाला. यानंतर या चोरट्यांच्या टोळीतील इतर सदस्यांनी रस्ते अपघाताचा बनाव करत त्या दोघांचे मृतदेह परभणी येथे नेले त्या ठिकाणी हा प्रकार समोर आला.

अविनाश पाटोळे व आकाश आडे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे त्यांचे साथीदार आकाश पेठे, दीपक भगत व वैभव आदत यांच्यासह पुणे येथून केज तालुक्यात आले होते.त्या ठिकाणी नांदूर घाट शिवारात असलेल्या हाय व्होल्टेज टॉवरवर चढून तार चोरी करत होते. यावेळी टॉवर कोसळल्याने या दोघांचा मृत्यू झाला त्यानंतर इतर साथीदारांनी त्या दोघांचे मृतदेह एका कार मध्ये टाकून परभणी कडे गेले.त्या ठिकाणी इतर साथीदारांनी हे मृतदेह गाडीतच सोडून पलायन केले यानंतर गाडीच्या चालकाने हे मृतदेह ॲम्बुलन्सच्या मदतीने रुग्णालयात दाखल करत असताना नातेवाईकांना ही बाब समजल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.दरम्यान यानंतर परभणी व केज पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *