News & View

ताज्या घडामोडी

IMG 20260323 WA0013

व्हिडीओ व्हायरल केले, बीडसह तीन तरुणावर गुन्हे दाखल!

बीडलिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तीन आंबट शौकीन तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे हे व्हिडीओ व्हायरल करताना दहा वेळा विचार करा.

नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर आले आणि एकाच खळबळ उडाली. त्याचे अनेक व्हिडीओ यानंतर व्हायरल झाले. हे व्हिडीओ व्हायरल केले म्हणून कोपरगावमधील राहुल शिंदे आणि योगेश आढाव याच्यासह बीडमधील संदीप गरजे या तीन जणांच्या विरोधात अहिल्यानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र टीम रवाना झाल्या आहेत.

अहिल्यानगर पोलिसांनी तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९४ (२), ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी राहुल शिंदे याला त्याचा मित्र योगेश आढावने पाठवले. तर योगेश आढाव याला बीड जिल्ह्यातील माजलगावमधील संदीप गरजे याने हे व्हिडिओ पाठवल्याचं पोलीस तपासात समोर आहे. व्हिडिओ पाठवणाऱ्या आरोपींची साखळीच या प्रकरणात पोलिसांनी केली. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना विरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे.

खरात बाबाचे अनेक कांड उघडकीस!

हा तपास सुरू असताना अशोक खरातचे अनेक कांड उघडकीस येत आहेत. पोलिसांनी त्याची सगळी कुंडलीच बाहेर काढली आहे. त्याने वयाच्या १७ व्या वर्षीच पहिला कांड केल्याचं तपासातून समोर आलं आहे.

१९६५ साली सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी इथं जन्म झालेल्या अशोक खरातने वयाच्या १७ व्या वर्षी पहिला कांड केला होता. त्याने आपल्याच नात्यातील एका तरुणीचं लैंगिक शोषण केलं होतं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तो गावातून पळून गेला होता. मर्चंट नेव्हीत नोकरी मिळाल्याचं कारण सांगून त्यानं गावातून काढता पाय घेतला होता. यानंतर त्याने जवळपास सहा ते सात वर्षे मर्चंट नेव्हीत हमाल म्हणून काम केलं. पण तो जेव्हा गावात परतला तेव्हा त्याने आपण मर्चंट नेव्हीत कॅप्टन असल्याची थाप मारली.

याच्या या खोटेपणाला अनेकजण बळी पडले. मर्चंट नेव्हीमध्ये काम करताना तो काही काळ पश्चिम बंगालमध्ये देखील वास्तव्यास होता. याच ठिकाणी त्याने भोंदूगिरीचे धडे गिरवल्याचं सांगण्यात येतं. हाचचलाखी शिकाल्यानंतर त्याने नाशिकमध्ये येऊन १९९७-९८ साली ऑफिस थाटलं आणि भोंदूगिरीचा बिझनेस सुरू केला.

शाळेत कोंबडीचोर म्हणून प्रसिद्ध
अशोक खरातने भोंदूबाबा बनून अनेकांना खोटे गंडे, दोरे आणि खडे देऊन चुना लावला आहे. पण अशोक खरात शालेय वयापासून यात पटाईत असल्याची माहिती आहे. तो आपल्या स्वत:च्या घरातून कोंबड्यांची अंडी चोरायचा आणि शाळेत विकायचा अशी माहिती आता समोर आली आहे. यामुळे शाळेत त्याला कोंबडी चोर आणि मोटर चोर नावाने चिडवायचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *