News & View

ताज्या घडामोडी

bashir ganj post office beed ho beed post office scheme 2kwyyk6

पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बीडमध्ये खळबळ!

बीड -राज्यातील सर्वच पोस्ट ऑफिस बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी बीडच्या मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये बॉम्ब शोध पथक आणि पोलीस दल दाखल झाले. दुपारपर्यंत यामुळे पोस्ट ऑफिस बंद होते.

स्वतःला ‘कोयंबटूरचे मुसलमान’ म्हणवून घेणाऱ्या एका अज्ञात गटाने हा ई-मेल पाठवला आहे. या संदेशात अत्यंत प्रक्षोभक भाषेत धमक्या देण्यात आल्या आहेत. तामिळनाडूतील काही राजकीय घडामोडी, केंद्र सरकारची यूएपीए (UAPA) अंतर्गत झालेली कारवाई आणि या प्रकरणांमध्ये माध्यमांनी अपेक्षित साथ न दिल्याने निर्माण झालेल्या रागातून हे पाऊल उचलल्याचा दावा या गटाने केला आहे. विशेष म्हणजे, हे स्फोट घडवण्यासाठी नक्षलवादी आणि आयएसआय (ISI) सेलची मदत घेतल्याचेही या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

 बीडमधील मुख्य टपाल कार्यालयात कमालीची गुप्तता आणि सतर्कता पाळण्यात आली. यासंदर्भात खात्री करण्यासाठी बीड पोस्ट ऑफिसमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी अशा प्रकारचा निनावी ई-मेल आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनेनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी 12 वाजेच्या सुमारास टपाल कार्यालयातील सर्व ग्राहक आणि नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले होते. काही काळ कार्यालयीन कामकाज थांबवून परिसराची बारकाईने पाहणी करण्यात आली.

राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमधील पासपोर्ट कार्यालयांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये पोलिस प्रशासन आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) तपासणी सुरू केली आहे. हा ई-मेल कुठून आणि कोणत्या आयपी ॲड्रेसवरून आला आहे, याचा शोध सायबर सेलकडून घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *