News & View

ताज्या घडामोडी

images 47

लाचखोर तहसीलदार मुंडे सस्पेंड!

परळीवीस हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेला परळीचा तहसीलदार व्यंकटेश मुंडे याला विभागीय आयुक्त यांनी सस्पेंड केले आहे. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात परळी येथील तहसीलदार मुंडे याने एपत प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजाराची मागणी केली होती. तडजोडी नंतर वीस हजार रुपये घेण्याचे ठरले. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून मुंडे याच्यावर कारवाई केली होती.

मुंडे याच्या घर झडती मध्ये 55 हजार रुपये रोख आणि 13 तोळे सोने सापडले होते. यानंतर त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आला होता.

13 मार्च रोजी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी मुंडे ला सस्पेंड केले.निलम्बन काळात मुंडे ला जालना जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *