News & View

ताज्या घडामोडी

Maharashtra 12 Zilla Parishads and 125 Panchayat Samitis Voting Live Updates in Marathi

मिनि मंत्रालयावर भाजपचे वर्चस्व!

मुंबई -राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्यातील भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने तब्बल 201 जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेने 118 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी ने 97 जागांवर आघाडी घेतली आहे.

मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून महायुतीने (भाजप, शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) विरोधकांवर मोठी आघाडी घेतली आहे. एकूण ७३१ जागांपैकी 531 जागांचे कल हाती आले असून, त्यामध्ये महायुती 406 जागांवर आघाडीवर आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोठे यश
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत प्रभावी कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीच्या कलानुसार अजित पवार गट 97 जागांवर आघाडीवर असून, ग्रामीण भागातील आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पकड त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. शरद पवार गटाच्या तुलनेत अजित पवार गटाला मिळालेले हे यश राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
पक्ष / आघाडी,आघाडीवर असलेल्या जागा
• भाजप-200
• शिवसेना (शिंदे गट)-118
• राष्ट्रवादी (अजित पवार गट)-97
• काँग्रेस-53
• शिवसेना (ठाकरे गट)-27
• राष्ट्रवादी (शरद पवार गट)-15
• इतर / अपक्ष-26
प्रमुख वैशिष्ट्ये:
• भाजप अव्वल: 201 जागांसह भाजप राज्यातील नंबर १ चा पक्ष ठरण्याच्या मार्गावर आहे.
• शिंदे गटाची साथ: 11८ जागांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही कोकण आणि मराठवाड्यात आपली ताकद दाखवून दिली आहे.
• विरोधकांची पिछेहाट: महाविकास आघाडीत काँग्रेस 43 जागांवर आघाडीवर असली, तरी ठाकरे गट (२7) आणि शरद पवार गट (15) यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *