News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक कृष्ण त्रयोदशी
🌸 नक्षत्र…. स्वाती
🌸 वार…, मंगळवार
🌼 दिनांक….. १८ नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
दिनांक १८ नोव्हेंबर २०२५

मेष
आज
आज तुम्ही कामात जलद निर्णय घेऊ शकाल. आर्थिक लाभाची चिन्हे. आरोग्य सामान्य राहील. घरातील जबाबदाऱ्या नीट पूर्ण करतील.

वृषभ
आज
चन्द्र लाभ बुध योगामुळे नोकरी–व्यवसायात अनपेक्षित लाभ. घरात शुभघटना. स्त्रियांसाठी खरेदीसाठी उत्तम वेळ.

मिथुन
आज
आज तुमची संवादकौशल्ये प्रभावी राहतील.इतरांवर प्रभाव वाढेल. मित्रमैत्रिणीसोबत चांगला वेळ जाईल. ऑफिसमध्ये कौतुक मिळेल.

कर्क
आज
आज मन शांत पण व्यवहारात व्यावहारिक राहणे गरजेचे. जुने अडथळे दूर होतील. मुलांकडून आनंद दायक बातमी मिळेल.

सिंह
आज
चन्द्र त्रिकोण हर्षलमुळे अचानक चांगली बातमी. सोशल लाइफ सक्रिय. सौंदर्य, फॅशन, ज्वेलरी ,कला क्षेत्रातील महिलांना विशेष लाभ.

कन्या
आज
चन्द्र तुमच्या राशीत — ऊर्जा वाढलेली जाणवेल. नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस. आरोग्य सुधारेल.अचानक लाभ होतील. सोशल मिडिया मार्फत लाभ होतील,कौतुक होईल.

तुळ
आज
आज खर्च वाढेल परंतु योग्य ठिकाणी. मन धार्मिक–आध्यात्मिक विषयाकडे ओढले जाईल. वैवाहिक जीवन समाधानकारक.

वृश्चिक

ओळखीच्या लोकांकडून आज मदत मिळेल. कामे मार्गी लागतील. अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता. भावनिक निर्णय टाळा.

धनु
आज
कामाचा तणाव थोडा जाणवेल पण प्रयत्न यशस्वी होतील. करिअर संदर्भात शुभ संधी. पतीची साथ मिळेल.

मकर
आज
आज भाग्य मजबूत. दूरचे प्रवास, शिक्षण आणि स्पर्धेत यश. नवीन शिकण्याची इच्छा वाढेल.

कुंभ
आज
आरोग्याची थोडी काळजी घ्या. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. कुटुंबात जुळवून घेण्याचा सल्ला.

मीन
आज
वैवाहिकजीवनात /प्रेमसंबंधात समाधान. चांगला संवाद होईल. ऑफिसमध्ये काम सुरळीत पार पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *