सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल द्बितीया
🌸 नक्षत्र…. रोहिणी
🌸 वार… शुक्रवार
🌼 दिनांक….. ०७ नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️
दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५
मेष:- आज व्यय स्थानात आणि नंतर तुमच्याच राशीत चन्द्र आहे.प्रवास कार्यसाधक राहील.पतीशी मतभेद होऊ शकतात. खर्च वाढेल.दुपारनंतर आत्मविश्वास वाढेल. भागीदारी व्यवसायात लाभ.शत्रु पीडा होऊ शकते.आरोग्य संभाळा. दुपारनंतर स्वतः साठी खर्च कराल.शुभ समाचार मिळेल.
वृषभ:- आज सकाळ चे सत्र अनुकूल आहे.दुपारनंतर आळस दाटेल.भावनिक चढउतार राहील.सहकारी सहकार्य करणार नाहीत.मैत्र मंडळी मार्फत लाभ होतील.
मिथुन:- आज अनपेक्षित लाभ होतील.कामात यश मिळेल.यश ,मानसन्मान मिळेल.नवीन ओळखीतून लाभ होतील.विवाह इच्छुकांना थोडी वाट पहावी लागेल.
कर्क:- आज अधिकार वाढेल.पतीची मर्जी राहील.प्रतिष्ठा राखा. घरगुती वातावरण शांत ठेवा.
सिंह:- आज काळजी घ्या.मोठी हानी होऊ शकते.थकवा जाणवेल.परदेशी ओळखीचा फायदा होईल.
दुपारनंतर छोटे प्रवास घडतील.मैत्र मंडळींशी भेटी होतील.संततीसाठी खर्च होईल.
कन्या:- आज नवे मित्र मैत्रीणी होतील.व्यवसाय वाढेल.दुपारनंतर संतती ची चिंता वाटेल.घाईगडबडीत निर्णय घेऊ नये.मनस्वास्थ चांगले राहण्यासाठी आवडता छंद जपा.
तुळ:- आज कठोर बोलणे होईल.खर्च वाढेल.दुपारनंतर कौटुंबिक सुख लाभेल.सत्संग लाभेल.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.
वृश्चिक:- आज नातेवाईकांचे आदरातिथ्य करावे लागेल.खर्च वाढतील.शैक्षणिक यश मिळेल.कलाकार यशस्वी ठरतील.दुपारनंतर आरोग्य सांभाळा.
धनु:- आज मेहनत जास्त पण लाभ त्या मानाने कमी असा दिवस राहील.गुंतवणूकीतून अचानक लाभ होऊ शकतो.सहकाऱ्यांकडून लाभ होऊ शकतात.मनोरंजक कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल.
मकर:- आज छोट्या सहली होतील.आवडत्या व्यक्ती चा सहवास लाभेल.नवीन खरेदी होईल.कौटुंबिक वातावरण शांत ठेवा.
कुंभ:- आज कामे होतील.प्रिय व्यक्ती चा सहवास लाभेल.आवडत्या पदार्थाचा आस्वाद घ्याल.छोटे प्रवास घडतील.
मीन:- आज तुमच्या राशीत धनस्थानी चन्द्र आहे.नवीन वस्त्रे, अलंकार खरेदी होईल.नावलौकिक वाढेल.कौटुंबिक सहकार्य मिळेल.संतती कडून खूष खबर मिळेल.प्रेमात यश.












Leave a Reply