सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन कृष्ण दशमी
🌸 नक्षत्र…. आश्लेषा
🌸 वार… गुरुवार
🌼 दिनांक….. १६ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०६/०७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी मंथन‼️
दिनांक १६ ऑक्टोंबर २०२५
मेष:
आज कामात प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा संभवते. मित्रपरिवारात आदर वाढेल. प्रवास यशस्वी ठरेल.
वृषभ:
घरातील वातावरण आनंददायी राहील. जोडीदारासोबत गोडवा वाढेल. पण खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. महत्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मिथुन:
कामातील ताण वाढू शकतो. वरिष्ठांशी गैरसमज होऊ नये म्हणून शब्द विचारपूर्वक वापरा. सायंकाळी समाधानकारक घटना घडतील.
कर्क:
चंद्र आपल्या राशीत असल्याने आत्मबल वृद्धिंगत होईल. मानसिक स्थैर्य लाभेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. कौटुंबिक कार्यात भाग्याची साथ राहील.
सिंह:
गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींना दुर्लक्ष करू नका. परिश्रमाने मिळवलेले यश टिकवून ठेवा.
कन्या:
सहकारी व मित्रांकडून सहकार्य मिळेल. नवे संपर्क उपयोगी ठरतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. सायंकाळी आनंदाचा प्रसंग.
तुळ:
कामात स्थिरता येईल. पदोन्नतीची शक्यता. वरिष्ठांचा विश्वास संपादन होईल. वडिलांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल.
वृश्चिक:
प्रवास शुभ ठरेल. शिक्षण, परदेश, किंवा धार्मिक विषयात प्रगती संभवते. परंतु भावनांवर नियंत्रण आवश्यक आहे.
धनु:
अचानक खर्च वाढेल. आर्थिक विषयात काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. मनात अस्वस्थता वाढू शकते. ध्यान साधनेचा लाभ होईल.
मकर:
व्यवसायिकांना आज चांगली संधी मिळेल. भागीदारीतून फायदा. जोडीदाराकडून प्रोत्साहन मिळेल. विवाहयोग्यांना प्रस्ताव येण्याची शक्यता.
कुंभ:
कामकाजात गती येईल. जुन्या योजनांना चालना मिळेल. पण थकवा जाणवेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.
मीन:
संतानाकडून आनंदवार्ता मिळेल. कला, सर्जनशीलता आणि प्रणय यांना वाव मिळेल. लॉटरी, शेअर्स किंवा गुंतवणुकीत लाभ संभवतो.












Leave a Reply