अंबाजोगाई- एक हजार रुपयांची लाच घेताना येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले.आठवडाभरात एसीबी ची लाचखोराविरुद्ध ही तिसरी कारवाई आहे.
तक्रारदार यांनी त्यांची बर्दापुर येथील शेतजमीन गट क्र. 532, 533 ची कायदेशीर फिस भरुन मोजनी करुन घेतली होती . सदर मोजनीचे हद्द कायम नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथुन प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता.
मुबारक बशिर शेख यांनी शासकीय फिस वगळता 1000 रुपयाची तक्रारदार यांचेकडे मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन बीड येथे तक्रार दिली त्यावरुन सापळा कारवाई केली असता शेख यांनी तक्रारदार यांचेकडे 1000 रुपयाची मागणी केली व पंचा समक्ष 1000 रूपये त्यांचे कक्षात तक्रारदार यांचेकडुन स्विकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
Leave a Reply