News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन शुक़्ल द्वितीया
🌸 नक्षत्र…. अश्विन
🌸 वार… बुधवार
🌼 दिनांक….. ०८ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०६/०७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी मंथन‼️
दिनांक ०८ आँक्टोंबर २०२५

मेष:- व्यय स्थानी चंद्र आहे. आळशी लाभ योग आहे आत्मविश्वास जरी कमी झाला तरी आज अचानक धनलाभाचा योग् आहेत. कर्जे मंजूर होतील. बँकेतील कामाला गती मिळेल. गूढ उलगडतील.

वृषभ:- अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्या राशीतील हर्षल शी अनुकूल चंद्राचा शुभ योग आहे. आज मनासारखी कामे होतील. तुमचा निर्णय अचूक ठरणार आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या कल्पना सुचतील. मन उत्साही राहील.

मिथुन:- व्यवसाय आणि नोकरी यात काही मोठे बदल घडण्याचा कालावधी आहे. खर्च वाढेल मात्र त्याचे दुःख होणार नाही. सकाळच्या सत्रात महत्वाचे निर्णय घ्या.

कर्क:- नवम स्थानी चंद्र आहे. तुम्ही मुळात धार्मिक आहात. आज हर्षलची अनुकूलता अधिक आहे. त्यामुळे काहीतरी जगावेगळे करण्याची इच्छा होईल. अचानक लाभ होतील.

सिंह:- अष्टम स्थानी चंद्र आहे. सध्या तुमचा उत्साह दांडगा आहे. मन आनंदी आहे. आज काही अप्रिय घटना घडू शकतात. मात्र फारसे काजीचे कारण नाही. नोकरीच्या ठिकाणी अनोळखी व्यक्तीकडून सहकार्य लाभेल.

कन्या:- सप्तम स्थानी चंद्र आहे. नवम हर्षलशी शुभ योग आहे. आज अचानक प्रवास घडू शकतात. शत्रू पराभूत होतील. तुमचा मत्सर करणारे आज शांत राहतील. भाग्योदय होउ शकतो.

तुळ:- षष्ठ स्थानी चंद्र आहे. हर्षलची अशुभता आज काहीशी कमी जाणवेल. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. आढचणींचा चक्रव्यूह भेदून तुम्ही यशाची पायरी चढू शकाल.

वृश्चिक:- आज यशाचा दिवस आहे. स्पर्धेत तुम्ही मोठी झेप घ्याल. शत्रू पराभूत होतील. दूर गेलेली व्यक्ती पुन्हा जवळ येईल. तुम्हाला होणार विरोध कमी होईल. अचानक शेअर्स किंवा लोटरीतून लाभ होतील.

धनु:- चतुर्थ स्थानी चंद्र आहे. शनी आणि नेपच्यूनशी आज युती आहे. आरोग्यात सुधारणा होईल. गुप्त शत्रूंचा त्रास कमी होईल. हरवलेली वस्तू सापडेल. नोकरीत अधिक लाभ होतील. जलपर्यटन घडेल.

मकर:- शेअर्स किंवा लॉटरीतुन अचानक लाभ होतील. अंदाज बरोबर येतील. नात्यात कटुता येऊ देऊ नका. आज नवीन ओळखी होतील. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. बोलताना काळजी घ्या.

कुंभ:- द्वितीय स्थानी चंद्र आहे. धन स्थानात शनी आहे. तुम्हाला सध्या आर्थिक चणचण भासते आहे. कितीही उत्पन्न वाढले तरी खर्च देखील वाढत आहेत. वास्तू संबंधित व्यवहार आज पुढे सरकतील.

मीन:- आज तुमच्या राशीत चंद्र आहे. आज उत्तम व्यवसाय होणार आहे. आर्थिक लाभ भरपूर होणार आहेत. तुम्हाला यशासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे मात्र यश नक्कीच मिळणार आहे. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *