News & View

ताज्या घडामोडी

2

आष्टी तालुक्यातील पन्नास गावकरी पुरात अडकले!

प्रशासन इयरलिफ्ट करण्याच्या तयारीत!

बीड – तब्बल 24 तासापेक्षा अधिक काळापासून बीड जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे नदी नाल्यांना महापूर आला असून आष्टी तालुक्यातील सहा गावांमधील 50 पेक्षा अधिक लोक पुराच्या प्रमाणात अडकल्याने त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.

बीड जिल्हातील आष्टी तालुक्यामधील, कडा गावामध्ये 11 लोक, सोभा निमगाव मध्ये 14 लोक, घाटा पिंपरी 07 लोक, पिंपरखेड 06 लोक, धानोरा मध्ये  03 आणि डोंगरगण मध्ये 03 असे लोक अडकलेले आहेत. एकूण 06 गावात 44 लोकं अडकलेली आहेत .

जिल्हाधिकारी, बीड यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार, नगर जिल्ह्यातून लष्कराची तुकडी मदत कार्यासाठी मागविण्यात आली आहे तसेच अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करण्यासाठी नाशिक वरून हॅलिकॉप्टर मागविण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे पुणे येथुन एनडीआरएफ ची टिम बीड येथे पाठविण्यात येत आहे.

आष्टी तालुक्यातील धामणगाव, दौलावडगाव, धानोरा, नांदूर, घाटा पिंप्री, देवळाली, देविनिमगाव, कुंठेफळ, केळ,पिंपळगाव, हरेवाडी, मराठवाडी, देऊळगाव घाट, बांदखेल, खिळद, गहुखेल, सुलेमान देवळा,दादेगांव, कारखेल खुर्द, आरणवीहिरा, तागडखेल, म्हसोबाचीवाडी, बाळेवाडी, कुंभेफळ, पुंडी इत्यादी ठिकाणी नदीचे पाणी पुलावर वाहत असल्याने इतर गावाचा संपर्क तुटला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पूरस्थिती बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला असून इंडिया आणि एसटीआरएफ यांच्या तुकड्या अहिल्यानगर जिल्ह्यातून पाचारण करण्यात आल्या आहेत. स्वतः अजित पवार हे या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून माजलगाव मांजरा यासह उर्दू कुंडलिका या प्रकल्पामधून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पाहता ग्रामस्थांनी आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत.

अधिक माहिती साठी YouTube ला पहा https://youtu.be/oQixJOml9fo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *