सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 भाद्रपद शुक्ल दशमी / गौरी विसर्जन रा. ०९/५० पर्यंत
🌸 नक्षत्र… मुळ
🌸 वार… मंगळवार
🌼 दिनांक….. ०२ सप्टेंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/०६ मि.
🌘 सुर्यास्त ०६/५० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो
🚩 🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी मंथन ‼️दिनांक ०२ सप्टेंबर २०२५
मेष:- चंद्राचा सूर्याशी त्रिकोण योग आहे. दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. सर्च क्षेत्रात यश मिळेल. अचानक लाभ होतील. भौतिक बाबींचा कंटाळा येऊ शकतो. अध्यात्मिक आवड निर्माण होईल.
वृषभ:- अष्टम स्थानी चंद्र आहे. सूर्याशी चंद्राचा शुभ योग आहे. अधिकार वाढतील. यश मिळेल. मानसिक सौख्य लाभेल. दृढ निश्चय केल्यास अडचणी दूर होऊ शकतात. कष्टाचे उशिरा पण नक्की फळ मिळेल.
मिथुन:- आज महत्वाची कामे पूर्ण करा. अचानक फायदा होईल. अनुकूल रवी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेन. दबदबा वाढेल. सरकारी कामे पूर्ण होतील. श्री. हनुमान उपासना चालू ठेवा.
कर्क:- अनुकुल दिवस आहे. नोकरीत मनासारख्या गोष्टी घडतील. अचानक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. पित्याशी विसंवाद होऊ शकतो. धन धान्य वाढेल मात्र त्यासंबंधित काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
सिंह:- संमिश्र दिवस आहे. फारशी अनुकूलता नाही. पिडदायक घटना घडू शकतात. तुमच्या अधिकाराचा गैरवापर करू नका. दैवी उपासना करा.
कन्या:- अनुकूल दिवस आहे. अधिकार वाढतील. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. कोर्टात यश मिळेल. खर्च वाढणार आहे. मात्र सरकारी कामे मार्गी लागतील.
तुळ:- आर्थिक दृष्टीने यश देणारा कालावधी आहे. पत्नीची मोलाची साथ लाभेल. शत्रू पराभूत होतील. व्यवसाय वाढेल. धनलाभ होईल. अनुकूल सूर्य तुमचे तेज वाढवेन.
वृश्चिक:- आर्थिक बाजू मजबूत होईल. संतती कडून चांगली बातमी समजेल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. अडथळे दूर होतील. नवनविन मार्ग सापडतील. आरोग्य सांभाळा.
धनु:- आज अनुकुलता वाढेल. सूर्याची अनुकूलता लाभेल. सिद्धी प्राप्त करण्यास उत्तम ग्रहमान आहे. प्रेमात यश मिळेल. मात्र शत्रूभय वाढणार आहे. सहकार्याकडून राजकारणाचा अनुभव येईल.
मकर:- संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. अष्टम स्थानी रवी आहे मात्र आज त्याची प्रतिकुलता काहीशी कमी जाणवेल. नैतिक मार्ग सोडू नका. सामाजिक क्षेत्रात जपून रहा.
कुंभ:- अनुकूल चंद्र आहे. महत्वाची कामे मार्गी लावा. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी यांच्या मते सप्तम रवी मार्ग दाखवेन. शत्रूवर मात करू शकाल. दुसऱ्या शनी मुळे खर्च वाढतच आहेत. बचतीचे महत्व ओळखा.
मीन:- अनुकूल दिवस आहे. दशम स्थानी चंद्र आहे. कठोर निर्णय घ्याल. दबदबा वाढेल. आध्यत्मिक लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. विजयश्री खेचून आणाल.












Leave a Reply