News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250828 WA0012 scaled

धारूर तालुक्यात रिक्षा वाहून गेला, एकाचा मृत्यू!


किल्लेधारूर – धारूर तालुक्यात बुधवारी (दि.२७) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वाण नदीला पूर आला असून धारूर-आसरडोह आणि धारूर-आडस मार्गावरील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. या पाण्याच्या प्रवाहात रात्री चार चाकी आणि रिक्षा वाहून गेल्याने दोघे बेपत्ता होण्याच्या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. दरम्यान, यातील एकाचा मृतदेह सापडला असून अद्याप एकजण बेपत्ता आहे.


गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तांदळवाडी धरण भरून वाहत असून त्यामुळे आवरगाव व अंजनडोह येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी रात्री रूईधारूरहून अंजनडोहकडे जाताना रात्री आठ वाजता आडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे (४२) यांची कार पुलावरून वाहून गेली. प्रशासन, पोलीस व गावकर्‍यांनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम राबवली. अखेर गुरूवारी सकाळी सहा वाजता पुलापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांच्या मृतदेहाचा शोध लागला.
आवरगाव येथे
तरूण बेपत्ता
दरम्यान, आवरगाव पुलावरूनही रात्री बारा वाजता एक रिक्षा वाहून गेल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात अनिल बाबूराव लोखंडे (२६) हा तरूण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला आहे की, नदी, नाला किंवा ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोकादायक नाही याची खात्री करूनच प्रयाण करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *