बीड – बीड येथील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत एका मोठ्या घोषणाकडे डोळे लावून बसलेल्या संचालकांच्या पदरी सभा संपल्यावर निराशाच पडली ठरल्याप्रमाणे एक वर्षानंतर बँकेचे उपाध्यक्ष राजीनामा देतील आणि नव्या उपाध्यक्षाची निवड होईल हे अपेक्षित असताना लक्ष्मीकांत पारनेरकर यांना खुर्चीचा मोह न सोडवल्याने अनेक संचालक आणि इच्छुक अस्वस्थ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली. या सभेला बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष जोशी उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्यासहित सर्व संचालक सभासद उपस्थित होते.
पूर्णवादी नागरी सहकारी बँकेत आणखी एक नवीन पायंडा सुरू झाला आहे तो म्हणजे यापूर्वी विष्णू महाराज पारनेरकर आणि रामचंद्र महाराज पारनेरकर यांचे फोटो लावले जायचे मात्र आता त्यांच्यासोबत त्यांच्या रांगेत माजी अध्यक्ष डॉक्टर अरुण्यनंतर यांना आणि काही ठिकाणी भारत मातेला देखील स्थान देण्यात आले आहे डॉक्टर यांचा फोटो दोन्ही महाराजांसोबत लागत असल्याने चर्चा सुरू झाली आहे.
बँकेचे माजी अध्यक्ष डॉक्टर अरुण निरंतर यांच्या कार्यकाळातच ठरल्याप्रमाणे दरवर्षी एका संचालकाला उपाध्यक्ष पदाचे संधी द्यायची असे घोषित झाले होते त्यानुसार डॉक्टर निरंतर अध्यक्षा असताना उपाध्यक्ष पदावर लक्ष्मीकांत पारनेरकर यांची निवड झाली. डॉक्टर निरंतर यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतरही उपाध्यक्ष पदावर नवीन व्यक्ती बसवावी अशी चर्चा असताना पारनेरकर यांनी अध्यक्षपदासाठीच अर्ज भरला त्यावेळी डॉक्टर सुभाष जोशी यांना 11 मते तर यांना सहा मते मिळाली होती.
पूर्णवादी बँकेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पारनेरकर हे बीडमध्ये येऊन कारभार पाहतील अथवा बँकेच्या प्रगतीसाठी हातभार लावतील अशी अपेक्षा होती मात्र केवळ वार्षिक सर्वसाधारण सभा आणि काही महत्त्वाच्या बैठकांना हजेरी लावण्या पलीकडे त्यांनी काहीच केले नाही त्यामुळे देखील उपाध्यक्षपदाचे हे जो कड किती दिवस सांभाळायचे हे त्यांनी ठरवावे अशी चर्चा सुरू झाली आहे
अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पारनेरकर हे उपाध्यक्ष पद सोडतील असे वाटले होते पण त्यांनी ते आपल्याकडे कायम ठेवले. यानंतर 17 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या राजीनाम्याची घोषणा करतील आणि नवीन संचालकाला संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती परंतु पारनेरकर यांनी राजीनामा न दिल्याने उपाध्यक्षपदा कडे डोळे लावून बसलेले अनेक संचालक अस्वस्थ झाले आहेत.
डॉक्टर पारनेरकर हे काना मागून आले आणि उपाध्यक्ष झाले अशी देखील चर्चा सीनियर संचालकांमध्ये असून जाणीवपूर्वक खुर्चीला चिटकून त्यांना नेमके काय साध्य करायचे आहे अशी चर्चा या संचालकांमधून होत आहे पारनेरकर यांनी खुर्चीचा मोह सोडून मोठ्या मनाने राजीनामा देऊन इतरांना संधी दिली असती तर त्यांचाही मान राखला गेला असता असेही बोलले जात आहे.












Leave a Reply