News & View

ताज्या घडामोडी

newsroom webbanner 4

वैद्यनाथ बँक मुंडे बंधू भगिनींच्या ताब्यात!

बीड -वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजयी आघाडी घेतली आहे. विरोधी पक्षाच्या पॅनलला अनेक ठिकाणी खात सुद्धा उघडता आले नाही हे विशेष.मतमोजणी अखेर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या पॅनलने बाजी मारली आहे.

वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या 36 मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले. एकूण 43 हजार 962 मतदारसंख्येपैकी 16 हजार 287 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण मतदानाची टक्केवारी 37.5 इतकी नोंदवली गेली आहे. नेहमीपेक्षा कमी मतदान झाल्याचे या निवडणुकीत दिसून आले. या निवडणुकीत एकूण 17 जागांसाठी स्पर्धा होती. त्यापैकी चार जागा आधीच पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलने जिंकल्या आहेत. उर्वरित 13 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली.

बँकेच्या १७ पैकी चार जागा बिनविरोध आल्याने उर्वरित १३ जागांसाठी मतदान झाले असून बँकेचे ४३ हजार ९६२ हजार सदस्य मतदार आहेत. बीड जिल्ह्यात ६७ मतदान केंद्र आहेत. लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, जळगाव, नाशिक, मुंबई, पिपरी चिंचवड, सोलापूर जिल्ह्यात हे बूथ आहेत.अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर सर्वसाधारण मतदार संघातून १२ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर निवडणुकीत महिला मतदार संघातून डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे, माधुरी योगेश मेनकुदळे, ओबीसी मतदार संघातून अनिल तांदळे तर अनुसूचित जाती मतदार संघातून विनोद जगतकर हे बिनविरोध आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *