अधिकाऱ्यांचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!
बीड – नागपूर बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणानंतर नागपूर विभागातील उपसंचालक आणि इतर अधिकाऱ्यांना अटक झाली त्यानंतर राज्य सरकारने राज्यस्तरीय एसआयटी घोषित केली त्यामुळे शिक्षण विभागातील वरपासून खालपर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून आता भ्रष्ट कारभार करणाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी या अधिकाऱ्यांनी आंदोलन करण्याचे नाटक सुरू केले आहे हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेत होत आहे.
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातील संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकारी सचिव संचालक उपसंचालक या दर्जाच्या लोकांनी कोट्यावधी रुपये घेऊन भ्रष्ट कारभार केला. शिक्षण विभागामध्ये शासनाची फसवणूक करत खोटे शालार्थ आयडी तयार करून हजारो बोगस शिक्षकांना नोकरी देण्यात आली.
बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रकरण नागपूर विभागात उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने 25 50 लाख रुपये घेऊन एका एका व्यक्तीला नोकरी दिली आणि ही यंत्रणा वर पासून खालपर्यंत कशी सडलेली आहे याचा पर्दाफाश झाला.
नागपूर विभागात घोडकेस आलेल्या घोटाळ्यामध्ये उपसंचालक शिक्षक मंडळ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शिक्षणाधिकारी अशा 20 पेक्षा अधिक अधिकारी आणि संस्थाचालकांना अटक झाली. हा सगळा घोटाळा केवळ नागपूर विभागापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यात शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्ट कारभार करत अधिकारी आणि संस्थाचालकांनी अब्जावधी रुपये कमवले असल्याचे राज्य सरकारच्या लक्षात आले.
त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्पेशल यासाठीची नियुक्ती केली तीन महिन्याच्या आत या यासाठीला अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही यासाठी नियुक्त झाल्यामुळे राज्यभरातील शिक्षणाधिकारी पे युनिट अधीक्षक राज्यभरातील उपसंचालक तसेच शिक्षण मंडळाचे अध्यक्ष या सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत आपल्या भ्रष्ट कारभाराचा मूर्ख फाटणार आणि आपल्याला जेलची हवा खावी लागणार यामुळे घाबरलेल्या या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सरकार विरुद्ध आंदोलन सुरू केले आहे.
आज पर्यंत एसी केबिन मध्ये बसून खोटे दस्तावेज तयार करून लाखो करोडो रुपये घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केल्याने जनतेमध्ये त्यांच्याप्रती प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे हा सगळा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे मत सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिस्तप्रिय मुख्यमंत्री अजित पवार आणि डॅशिंग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात कुठल्याही दबावाला बळी न पडता 2012 ते 2025 या दरम्यान खोट्या कागदपत्रांच्या आधारे हजारो शिक्षकांना नोकऱ्या देऊन शासनाच्या कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या शिक्षण विभागातील या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेलची हवा खाण्यासाठी पाठवावे आणि सरकार विरुद्ध आंदोलन करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करून इतरांना धडा द्यावा अशी मागणी होत आहे.












Leave a Reply