बीड- अदखलपात्र गुन्हा तातडीने निकाली काढण्यासाठी दहा हजाराची लाच घेताना वडवणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी रेवणनाथ गंगावणे यास पथकाने रंगेहाथ पकडले.
शेजाऱ्यासोबत असलेल्या जमिनीच्या वादातून वडवणी पोलिसात काही दिवसांपूर्वी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात वारंवार पोलिसांकडून त्रास दिला जात होता.तसेच पैशाची देखील मागणी केली जात होती.
तब्बल पन्नास हजार रुपये या प्रकरणी नाव काढण्यासाठी रेवणनाथ गंगावणे या कर्मचाऱ्याने मागितले होते.तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.खात्री केल्यानंतर सापळा रचून गंगावणे यास दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.
Leave a Reply