सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण शुक्ल अष्टमी / लोकमान्य श्री बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी/ लोक शाहीर श्री आण्णा भाऊ साठे जयंती
🌸 नक्षत्र… स्चाती
🌸 वार… शुक्रवार
🌼 दिनांक….. ०१ आँगस्ट २०२५
🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०५/४६ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशिभविष्य‼️
दिनांक ०१ आँगस्ट २०२५
मेष:- चंद्राचा गुरुशी त्रिकोण योग आहे. मन आनंदी राहील. वाहन सुख लाभेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळू शकते. तुमच्या हातून आज पुण्य कर्म घडेल. शेजाऱ्यांशी वादविवाद टाळावेत. पशूंपासून सावध राहावे. मौल्यवान वस्तू सांभाळा.
वृषभ:- व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील. आज कर्जे घेऊ नका. तुमच्या शब्दला मान मिळेल. आज मनासारखे पदार्थ चाखण्यास मिळतील. आरोग्य सांभाळावी लागेल.
मिथुन:- संमिश्र ग्रहमान आहे. आध्यत्मिक व्यक्तीची भेट होईल. सिद्धी प्राप्त होतील. गुंतवणुकीतून लाभ होतील. शेअर्स मध्ये अंदाज बरोबर येतील. मात्र बोलताना कळजी घ्या. वरिष्ठ नाराज होऊ देऊ नका.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. मनासारखी कामे पार पडतील. चंद्र – गुरू योग स्वप्ने साकार करतील. अचानक लाभ होतील. अध्यात्मिक सुखे प्राप्त होतील. दानधर्म कराल. एखाद्या अनाथ आश्रमास भेट द्याल. व्यावहारिक पातळीवर मात्र मनाचा गोंधळ उडेल. घर खरेदी पुढे ढकलली जाईल.
सिंह:- उत्तम सुरुवात आहे. अडचणी दूर होतील. नोकरीत चांगले अनुभव येतील. अनुकूल गुरुमुळे वास्तूचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत मिळेल. मात्र अपेक्षित सन्मान मिळणार नाही. चुकीचे व्यावसायिक निर्णय घेतले जाऊ शकतात.
कन्या:- व्यवसायासाठी संमिश्र ग्रहमान आहे. काही सुखद घटना घडतील. नोकरीत चांगले अनुभव येतील. कामाचा वेग वाढेल. रवी अन बुद्धाची अनुकूलता असली तरी आज त्याचा प्रभाव कमी जाणवेल.
तुळ:- आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. गुरुशी शुभ योग आहे. मन प्रसन्न करणारे वातावरण आहे. देवतांची कृपादृष्टी अनुभवास येईल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. भ्रमंती घडेल.
वृश्चिक:- संमिश्र ग्रहमान आहे. फारशी अनुकूलता नाही. आज महत्वाची कामे शक्यतो नकोत. तुम्ही धाडसी आहात.
मात्र आज नैतिकतेची चाड ठेवून कामे करावीत. हातून चूक होऊ देऊ नका. प्रवासात काळजी घ्या. सरकारी अधिकाऱ्यांशी वाद नकोत.
धनु:- चंद्र अनुकूल आहे. व्यावसायिक आणि इतर सर्व प्रकारचे लाभ होतील. मन आनंदी राहील. इच्छा पूर्ण होतील. मित्र मंडळी भेटतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. पत्नीची साथ लाभेल. मात्र घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्यावी.
मकर:- दशम स्थानी चंद्र आहे. बऱ्यापैकी अनुकूल दिवस आहे. नोकरीत खुश खबर मिळेल. भ्रमंती घडेल. परदेश गमनाचे योग आहेत. आजचा दिवस व्यावसायिक कामात व्यतीत होईल. विनाकारण शत्रूत्रास संभवतो. आर्थिक येणी येण्यास वेळ लागेल.
कुंभ:- नवम स्थनी चंद्र आहे. त्याचा पंचम गुरुशी त्रिकोण योग आहे. हे ग्रहमान अनुकूल आहे. महत्वाची कामे आज पूर्ण होतील. मानसिक समाधान लाभेल. प्रवासाचे योग येतील. धनलाभ होईल. कुलदेवतेची प्रसन्नता लाभेल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. हातून चांगली कामे होतील. वेळेचा सदुपयोग करा. विनाकारण इतरांच्या प्रश्नात लक्ष घालू नका. वरिष्ठांची नाराजी ओढवून घेऊ नका.












Leave a Reply