बीड – सहा महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेला तरी ज्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जिल्हाध्यक्ष वगळता एकही पदाधिकारी नियुक्त करण्याचे सुचले नाही त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविवारी बीडमध्ये येऊन कोणत्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार अशी चर्चा सुरू झाली आहे ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच जिल्ह्यात पक्षाची जर एवढी दयनी अवस्था असेल तर पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश कसे मिळवणार असा सवालही उपस्थित होत आहे
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यावर 1995 नंतर गोपीनाथ मुंडे यांच्या रूपान भारतीय जनता पक्षाने पकड मजबूत केली मात्र 2012 नंतर त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि गोपीनाथ मुंडे यांच्या समोर आव्हान उभा केलं.
2012 ते 2025 या 13 वर्षाच्या काळात बीड जिल्ह्यात बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा मतदारसंघ यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचीच सत्ता राहिली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील गेवराई माजलगाव आणि परळी या तीन मतदार संघावर अजित पवार गटाने यश मिळवले.
डिसेंबर 2024 मध्ये मजा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केस तालुका अध्यक्ष जयराम चाटे यांच्यासहित अनेक पदाधिकारी आरोपी म्हणून निष्पन्न झाल्यानंतर अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे संपूर्ण कार्यकारणी बरखास्त केली होती.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण हे जिल्हाध्यक्ष असले तरी लातूरला बसून जिल्ह्याचा कारभार हाकण्याचा प्रयत्न करतात कुठल्याही पदाधिकाऱ्याची किंवा स्थानिक पातळीवरच्या नेत्याशी थेट बोलण्याचा टाळतात मुंबईमध्येच जास्त वेळ रमतात अशी देखील त्यांच्याबद्दल तक्रार आहे.
अशा परिस्थितीत अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात सहा महिन्यापासून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे निवडी झालेल्या नाहीत माजी मंत्री धनंजय मुंडे हे मागील महिनाभरापासून सक्रिय झाले आहेत मात्र पदाधिकारीच निवडले नसतील तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रविवारी येऊन कोणाशी संवाद साधणार आणि कोणाला मार्गदर्शन करणार तसेच पदाधिकाऱ्यांचे निवडी कधी होणार अशी चर्चा रंगू लागली आहे.












Leave a Reply